धुळे जिल्ह्यात उन्हाळ्यातही जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:40 PM2018-05-04T13:40:38+5:302018-05-04T13:40:38+5:30

शिक्षण विभागाचे शाळांना तोंडी आदेश : अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या सूचना

In Dhule district, the Zilla Parishad's school was also started in the summer | धुळे जिल्ह्यात उन्हाळ्यातही जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू

धुळे जिल्ह्यात उन्हाळ्यातही जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू

Next
ठळक मुद्दे्रअप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करावे विना दप्तरची शाळा दोन तास सुरू राहील शाळा

आॅनलाइन लोकमत
धुळे : अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुटीतही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू ठेवण्याच्या तोंडी सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्यातही जि.प.च्या शाळा सुरू आहेत.
दरवर्षी १ मे रोजी महाराष्टÑ दिनी ध्वजारोहण व निकाल वाटप झाल्यानंतर २ मे पासून शाळांना सुट्या लागत असतात. साधारणत: जि.प.शिक्षकांना  उन्हाळ्याच्या ३८ दिवस सुट्या मिळत असतात. उन्हाळी सुट्यांचे शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात येत असते.
मात्र यावर्षी उन्हाळी सुट्यांचे अद्यापही नियोजन करण्यात आलेले नाही. एवढेच नाही तर उन्हाळ्याच्या सुटीतही शाळा सुरू ठेवून पहिली ते चौथी पर्यंतच्या अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे अशा तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात सकाळी ८ ते १० यावेळेत शाळा सुरू आहेत.  विशेष म्हणजे उन्हाळ्यात भरणारी ही शाळा बिनादप्तरची आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करून द्यायची आहे. विविध प्रकारची माहिती द्यायची आहे.
दरम्यान शिक्षण विभागाचे आदेश प्रमाण मानून एका शाळेवर दोन-दोन शिक्षक जात आहेत. मात्र अद्यापतरी विद्यार्थी शाळांकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांना केवळ वर्ग उघडून दोन तास बसावे लागत आहे.
विद्यार्थी येत नाही तर शिकवायचे कोणाला?
विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. विद्यार्थी नियमित शाळेत येत नाही तर उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीत कसे येणार? विद्यार्थीच येणार नाही तर शिकवायचे कोणाला? असा प्रश्न काही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराज यांची नुकतीच भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, अध्ययनस्तर निश्चितीची   अपग्रत विद्यार्थ्यांसाठी पुरक अध्यापन वर्ग सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यामुळे व उन्हाची तीव्रता जास्त असल्याने, मुले आता शाळेत येत नाहीत. त्यामुळे अध्यापनात अडचणी निर्माण होतात. तरी पुरक अध्यापनाचा वर्ग १५ जून नंतर सुरू करण्यात यावा. तसेच टंचाईग्रस्त गावांमध्ये शालेय पोषण आहार देण्याचे कळविले आहे. परंतु विद्यार्थीच येत नाही तर पोषण आहार द्यावा कसा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, बापू पारधी, चंद्रकांत सत्तेसा, प्रवीण भदाणे, भूषण सूर्यवंशी आदीजण उपस्थित होते.
 

Web Title: In Dhule district, the Zilla Parishad's school was also started in the summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.