धुळे विभागात १४०० ज्येष्ठ नागरिकांनी केली स्मार्टकार्डसाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:01 PM2019-06-29T12:01:31+5:302019-06-29T12:02:23+5:30

पंधरा ते वीस दिवसात ज्येष्ठांना मिळणार कार्ड

In Dhule division, 1400 senior citizens have registered for smart card | धुळे विभागात १४०० ज्येष्ठ नागरिकांनी केली स्मार्टकार्डसाठी नोंदणी

धुळे विभागात १४०० ज्येष्ठ नागरिकांनी केली स्मार्टकार्डसाठी नोंदणी

Next
ठळक मुद्देजून महिन्यापासून प्रत्येक आगारात नोंदणीनोंदणीसाठी मिळतोय प्रतिसादवीस दिवसांच्या आत मिळणार कार्ड

आॅनलाइन लोकमत
धुळे : एस.टी. महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रत्येक आगारात नोंदणीही सुरू झालेली आहे. धुळे विभागात आतापर्यंत जवळपास १४०० ज्येष्ठ नागरिकांनी ‘स्मार्ट कार्ड’साठी नोंदणी केल्याची माहिती धुळे विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली.
सुरक्षित प्रवास म्हणून अनेकांची पसंती एस.टी. महामंडळाच्या बसने प्रवास करण्याला पसंती असते. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवास करतांना ज्येष्ठ नागरिकांना तिकीटाच्या दरात सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा बसद्वारे प्रवास करण्याकडे सर्वाधिक कल आहे.
एस.टी.महामंडळानेही आता कात टाकायला सुरूवात केली असून, त्यांनीही ‘डिजीटलायझेशन’चा स्वीकार केला आहे. यानुसारच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ची योजना अंमलात आणली आहे.
स्मार्ट कार्ड तयारी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ५५ रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. आॅनलाईन नोंदणीनंतर त्यास आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आगारात जाऊन नोंदणी करण्याची गरज आहे. नोंदणी झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना २० ते २५ दिवसात संबंधितांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोठे व किती किलोमीटरचा प्रवास केला याची माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या तिकीट दरावर ४ हजार किलोमीटर प्रवासाची मर्यादा होती. मात्र केवळ मतदान कार्ड, आधारकार्ड पाहून प्रवाशांना तिकीटे दिली जात होती. कोणी किती प्रवास केला याची माहिती महामंडळाला मिळू शकत नव्हती. मात्र आता या स्मार्ट कार्ड मशिनद्वारे स्वाईप करून प्रवास केल्यानंतर प्रवाशांच्या किलोमीटरची माहिती महामंडळाकडे संकलित होणार आहे. वर्षाच्या आत चार हजार किलोमीटरची मर्यादा संपली तर मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकाला तिकीटाचा पूर्ण दर देवून प्रवास करावा लागणार आहे.
मोफत प्रवास नाही
दरम्यान स्मार्टकार्डद्वारे मोफत प्रवास करता येणार असा संदेश सोशल मीडीयावर व्हायरल झालेला आहे. तो चुकीचा असून, कार्डद्वारे मोफत प्रवास करता येणार नाही. जी आधार, मतदानकार्डद्वारे तिकीटदरात सवलत आहे,तीच या कार्डद्वारे मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
१४०० जणांची नोंदणी
आतापर्यंत धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ९ आगारांमार्फत १४०० ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी नोंदणी केलेली आहे.
येत्या काही दिवसात हे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

Web Title: In Dhule division, 1400 senior citizens have registered for smart card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे