धुळे विभागातर्फे पंढरपुरसाठी २०० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:54 AM2019-07-06T11:54:48+5:302019-07-06T11:55:36+5:30

७ ते १३ जुलैपर्यंतचे केले आहे नियोजन

Dhule division will leave 200 buses for Pandharpur | धुळे विभागातर्फे पंढरपुरसाठी २०० बसेस सोडणार

धुळे विभागातर्फे पंढरपुरसाठी २०० बसेस सोडणार

Next
ठळक मुद्देधुळे विभागाच्या आठ आगारांतर्फे बसेस सोडणारविभागाला १ कोटी रूपयाचे उत्पन्न अपेक्षित

आॅनलाइन लोकमत
धुळे : विठू नामाचा गजर करीत पालखी-पायी दिंडीत सहभागी होऊन अनेक भाविक ३०० ते ३५० किलोमीटरचा पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करीत असतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून विठूमाऊलीच्या चरणी नतमस्तक होत असतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभाग यंदा तब्बल २०० बसेस सोडणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रा भरत असते. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातून हजारो भाविक ‘पांडुरंगा’च्या दर्शनासाठी पंढरपुरला जात असतात. काहीजण पायी तर काहीजण राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपुरला जाऊन विठ्ठल-रूख्मिणीच्या चरणी नतमस्तक होत असतात. भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षी ७ ते १३ जुलै असे पाच दिवस धुळे, साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, शिंदखेडा, नवापूर, व दोंडाईचा या आठ आगारातून बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यातून किमान १ कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
धुळे विभागातील बहुतांश बस गाड्या या धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकात येणार आहेत. धुळे मालेगाव, मनमाड,कोपरगाव, शिर्डी, राहूरी, अहमदनगर,करमाळा, टेंभुर्णीमार्गे बसेस पंढरपुरला जातील. ज्या गाड्यांमध्ये प्रवाशी संख्या कमी असेल, त्या गाड्यांमध्ये धुळे येथून प्रवाशांना बसविण्यात येणार आहेत. तर नवापूर, साक्री, नंदुरबारच्या काही जादा गाड्या या पिंपळनेर, सटाणा, नाशिकमार्गे पंढरपुरला जाणार आहेत.
धुळे विभागातील ३५ अधिकारी, कर्मचारी मॅकॅनिक ८ जुलै पासून पंढरपूर येथे विठ्ठल साखर कारखाना येथे यात्रा बसस्थानकावर जातील. तर पंढरपूरला जाणाºया प्रवाशांसाठी सर्व स्थानकांवर स्वतंत्र शेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रा प्रमुख म्हणून विभागीय वाहतूक अधिकारी किशोर महाजन हे काम पाहणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
 

Web Title: Dhule division will leave 200 buses for Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे