धुळे कृउबात व्यवहार सुरळीत; आवक कमी
By admin | Published: June 6, 2017 12:28 PM2017-06-06T12:28:48+5:302017-06-06T12:28:48+5:30
शहरातील दुकाने सुरू : भाजीपाल्यांच्या जादा दरामुळे ग्राहक त्रस्त
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.6 : धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सुरळीत व्यवहार सुरू होते. परंतु, शेतमालाची आवक खूपच कमी असल्यामुळे येथील बाजारात उपलब्ध असलेला माल जादा किंमतीने विकला जात होता. परिणामी, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले.
भूईमूग शेंगा व कांद्याची आवक कमी
मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भूईमूग शेंगाची आवक केवळ 15 क्विंटल तर कांद्याची आवक 400 क्विटंल झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव डी. सी. सिसोदीया यांनी दिली. ते म्हणाले, की येथील बाजार समितीत भूईमूग शेंगाची सरासरी 500 क्विंटल तर कांद्याची 4 ते 5 हजार रुपये क्विंटल आवक होत असते. परंतु, शेतकरी संपामुळे सलग सहाव्या दिवशी बाजारात कमी आवक झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गुरांचा बाजार भरला; पण प्रतिसाद नाही
धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी नियमित गुरांचा बाजार भरला होता. ग्रामीण भागातून काही मोजक्याच शेतक:यांनी गुरे विक्रीसाठी आणली होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.
350 क्विंटल भाजीपाल्याची आवक
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिवसभरात केवळ 350 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील शेतक:यांची भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. गेल्या पाच दिवसांपासून केवळ सरकारी 250 ते 300 क्विंटल भाजीपाल्याची आवक होत होती. परंतु, आज भाजीपाल्याची आवक ब:यापैकी झाल्यामुळे दुपारी बारा वाजेर्पयत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.
कांदा मार्केटमध्ये शांतता
साक्री तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पिंपळनेर, जैताणे, दहिवेल येथे कांदा मार्केट आजपासून पूर्ववत सुरू झाले. त्यापाश्र्वभूमीवर साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतक:यांना कांदा विक्रीसाठी आणावा, याउद्देशाने आवाहन करण्यात आले होते. परंतु, शेतकरी संपामुळे कांदा उत्पादक शेतक:यांनी आज दिवसभरात कांदा विक्रीसाठी न नेल्यामुळे येथील बाजारात शुकशुकाट दिसून आला. परिणामी, लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती साक्री कृउबातर्फे देण्यात आली.
शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात सुरळीत व्यवहार
मंगळवारी शिंदखेडा व शिरपूर शहरातील बाजारपेठेत सुरळीत व्यवहार सुरू होता. या दोन्ही शहरातील बाजारपेठेत नेहमीप्रमाणे खरेदीदारांची लगबग दिसून आली. या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठाही पूर्ववत सुरू होत्या.