धुळे हगणदरीमुक्त ; राज्यात चौथा क्रमांक!
By admin | Published: January 24, 2017 01:02 AM2017-01-24T01:02:08+5:302017-01-24T01:02:08+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियान : शासनाची घोषणा
धुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनातर्फे सोमवारी धुळे शहर हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले असून शहराला राज्यात चौथा क्रमांक मिळाल्याचा संदेश शासनाकडून दूरध्वनीवर आल्याची माहिती महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़
शहरात रविवारी आणि सोमवारी हगणदरीमुक्त ठिकाणांची पाहणी राज्यस्तरीय समितीने केली होती़ या समितीत नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी व आशा किरण संस्थेच्या दुर्गा भड यांचा समावेश होता़
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वितेसाठी नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, उपायुक्त रवींद्र जाधव, सहायक आयुक्त अभिजित कदम, अनुप दुरे, शहर अभियंता कैलास शिंदे, सी़एम़ उगले, रत्नाकर माळी यांनी परिश्रम घेतल़े
शहराची पाहणी करून सायंकाळी समिती परतली व त्यानंतर काही वेळातच शासनाने धुळे शहर हगणदरीमुक्त घोषित केल्याचा संदेश आयुक्त संगीता धायगुडे यांना दूरध्वनीवर प्राप्त झाला़