धुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद पाडले
By admin | Published: March 24, 2017 05:31 PM2017-03-24T17:31:37+5:302017-03-24T17:31:37+5:30
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात या महामार्गावर तब्बल 9 ठिकाणी शेतक:यांनी आंदोलन करून चौपदरीकरणाचे काम बंद पाडल़े
Next
9 ठिकाणी आंदोलन : योग्य मोबदल्यासाठी शेतकरी संतप्त
धुळे : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीसाठी शेतक:यांना योग्य मोबदला मिळालेला नाही़ तो मिळावा यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यात या महामार्गावर तब्बल 9 ठिकाणी शेतक:यांनी आंदोलन करून चौपदरीकरणाचे काम बंद पाडल़े
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरु आह़े ते होण्यापूर्वी शेतक:यांना त्यांच्या जमिनीचा योग्य स्वरुपात मोबदला मिळावा यासाठी शेतक:यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता़ पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही़ त्यामुळे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महामार्गाच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 9 ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारी काम बंद आंदोलन पुकारण्यात आल़े त्यात फागणे, कुसुंबा, नेर, शेवाळी, सुरपान, कोंडाईबारी, मोरकारंज्या, चिंचपाडा व नवापूर या ठिकाणांचा समावेश होता़ यावेळी प्रत्यक्ष महामार्गावरील कोणतेही वाहन अडविण्यात आलेले नव्हत़े तसेच आंदोलनावेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता़ जिल्हा प्रशासनाने शिष्टमंडळासोबत दुपारी चर्चा केली.