धुळेकरांनो, विकासकामांना विरोध करणाºयांकडे बोट दाखवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:36 PM2018-03-10T13:36:49+5:302018-03-10T13:36:49+5:30

आमदार अनिल गोटेंचे आवाहन, पांझराकाठच्या रस्त्यांच्या उद्घाटनास पंतप्रधान येतील

Dhule Karan, show the boat to protest against development works! | धुळेकरांनो, विकासकामांना विरोध करणाºयांकडे बोट दाखवा!

धुळेकरांनो, विकासकामांना विरोध करणाºयांकडे बोट दाखवा!

Next
ठळक मुद्दे- महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्याचे आवाहन- धनंजय मुंडेंची सीडी आपणच बाहेर काढल्याची आमदारांची स्पष्टोक्ती- पांझराकाठच्या रस्त्यांमुळे धुळयाचा कायापालट होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आतापर्यंत आपले एकही विकास काम विनाअडथळा पार पडलेले नाही़ पण त्यामुळे कधीही खचून गेलो नसून भविष्यातही खचणार नाही़ पण धुळेकरांनो, विकास कामांना विरोध करणाºयांकडे तुम्ही बोट दाखवा, असे आवाहन आमदार अनिल गोटे यांनी केले़ तसेच पांझराकाठच्या रस्त्यांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़
आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून ‘माझे शहर बदलतेय’ हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे़ या आंदोलनाच्या निमित्ताने शनिवारी साक्रीरोडवरील कल्याण भवन येथे बैठक झाली़ त्यावेळी आमदार गोटे बोलत होते़ देशाच्या संरक्षण राज्यमंत्र्यांनीच चौपाटी पाडण्याचे फर्मान सोडल्याचा गंभीर आरोप आमदार गोटे यांनी केला़ तसेच प्रत्येक विकास कामांना न्यायालयात जाऊन विरोध करणाºयांना आर्थिक पुरवठा कोणाकडून होतो? याचा शोध जनतेने घेतला पाहिजे, असेही आमदार गोटे म्हणाले़ महापालिकेतील सत्ता मिळविल्यास पहिल्या दोन महिन्यातच ५०० कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, त्यामुळे शहराच्या विकासासाठी मनपात सत्तापरिवर्तन करण्याचे आवाहन आमदार गोटेंनी केले़ या बैठकीत अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आपली मते मांडली़ तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध संघटनांनीही आमदारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला़ 



 

Web Title: Dhule Karan, show the boat to protest against development works!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.