धुळे - नरडाणा दरम्यान भूमिअधिग्रहणाच्या काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:26 PM2019-12-31T22:26:58+5:302019-12-31T22:27:31+5:30

मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्ग : पहिल्या टप्यात धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाचे काम नवीन वर्षात मार्गी लागणार

 Dhule - Land acquisition works started during Nardana | धुळे - नरडाणा दरम्यान भूमिअधिग्रहणाच्या काम सुरु

Dhule

googlenewsNext

राजेंद्र शर्मा ।
धुळे : मनमाड -धुळे - इंदूर रेल्वेमार्गाचे लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात रेल्वेमार्गाचे मनमाड - धुळे - इंदूर दरम्यान सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पहिल्या टप्यात धुळे ते नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामासाठी प्रत्यक्ष भूमीअधिग्रहणास सुरुवात देखील झाली आहे. परंतू विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामाची गती कमी झाली होती. आता पुन्हा कामाने गती घेतली असून पुढच्या वर्षात हे लवकरातलवकर मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
पश्चिम रेल्वे मुंबईच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या सर्व्हे अंतर्गत मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्गात येणाऱ्या क्षेत्रातील भूमिअधिग्रहण करण्यासाठी सर्व्हे कंपनीने मैलाचे दगड लावून सर्व्हे सुरु केला आहे. यासाठी प्रस्तावित रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी दगडांच्या खुणा लावण्यात येत आहे. मैलाचे दगड लावण्याचे काम मनमाडपासून सुरु झाले ते आता मध्यप्रदेशातील मानपूर पर्यंत पूर्ण झाले आहे. या रेल्वेमार्गाअंतर्गत पहिल्या टप्यात धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाच्या काम होणार असून त्यासाठी भूमिअधिग्रहणाच्या काम सुरु झाले आहे.
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग हा ३३९ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. यापैकी महाराष्ट्रात १९२ तर मध्यप्रदेशात १४७ किलोमीटर अंतर राहणार आहे. सातपुडा पर्वतरांगा असल्याने या मार्गावर दोन बोगद्यांचा देखील समावेश आहे़ ३३९ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर इंदूर ते बंदरगाह ट्रस्टपर्यंतचे अंतर १५० किलोमीटरने कमी होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे मनमाड, मालेगाव, धुळ्यासह मध्यप्रदेशातील खंडवा, बुºहानपूर, खरगोन, बडवानी जिल्ह्यात औद्योगिक विकास होईल.
पहिल्या टप्यातील धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी रेल्वे अ‍ॅण्ड पोर्ट कार्पोरेशनच्या माध्यमातून भूमिअधिग्रहीत करण्यात येत आहे. या कामाअंतर्गत भूमिअधिग्रहणासाठी धुळे तालुक्यातील बोरविहीर ते कापडणे दरम्यान खुणा लावण्यात आलेल्या आहेत. लवकरच नरडाणा पर्यंत खुणा लावून तिथपर्यंतची भूमिअधिग्रहीत करण्यात येणार आहे. कामास सुरुवात झाली असून त्याला आता वेग आला आहे. नवीन वर्षात हे काम पूर्ण होईल.

Web Title:  Dhule - Land acquisition works started during Nardana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे