Dhule: सासू पाठोपाठ जावायानेही घेतला जगाचा निरोप, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:28 PM2023-05-24T17:28:18+5:302023-05-24T17:28:43+5:30

Dhule: वयोवृद्ध सासूचे निधन  झाल्याचे दु:ख झाल्याने, जावायानेही बारा तासातच या जगाचा निरोप घेतल्याची घटना धुळे जिल्ह्यातील तऱ्हाडी  या गावात घडली.

Dhule: Mother-in-law followed by son-in-law also bid farewell to the world, cremation for both at the same time | Dhule: सासू पाठोपाठ जावायानेही घेतला जगाचा निरोप, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

Dhule: सासू पाठोपाठ जावायानेही घेतला जगाचा निरोप, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

googlenewsNext

- रावसाहेब चव्हाण
तऱ्हाडी (जि.धुळे)— वयोवृद्ध सासूचे निधन  झाल्याचे दु:ख झाल्याने, जावायानेही बारा तासातच या जगाचा निरोप घेतल्याची घटना धुळे जिल्ह्यातील तऱ्हाडी  या गावात घडली. सासू व  जावयावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. द्वारकाबाई राघो भामरे (वय १०५) व राजाराम बंडू वाघ (वय ७५) असे मयत सासू-जावयाची नावे आहेत.

द्वारकाबाई भामरे यांना तीनही मुलीच होत्या. मुलगा नसल्याने, त्यांची मोठी मुलगी कोकीळाबाई राजाराम वाघ व जावाई राजाराम बंडू वाघ (रा. कासोदा, ता. एरंडोल) हे गेल्या पाच वर्षांपासून तऱ्हाडी येथे वास्तव्यास आले. मुलगी-जावईच द्वारकाबाईच्या पालन पोषणाची जबाबदारी सांभाळत होते.

२३ मेरोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास द्वारकाबाईचे वृद्धपकाळाने निधन झाले. सासूच्या निधनाचे दु:ख झाल्याने, अवघ्या बारा तासाच्या अंतरातच जावाई राजाराम वाघ यांनीही २३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जगाचा निरोप घेतला. २४ मे रोजी सकाळी १० वाजता सासू-जावायाची सोबतच अत्ययात्रा काढण्यात येऊन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Dhule: Mother-in-law followed by son-in-law also bid farewell to the world, cremation for both at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.