Dhule Municipal Election 2018 : धुळे महानगरपालिकेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:26 PM2018-12-09T13:26:13+5:302018-12-09T13:51:36+5:30

तृतीयपंथीयांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.

For Dhule Municipal Corporation, 16 percent polling till 1 pm | Dhule Municipal Election 2018 : धुळे महानगरपालिकेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान

Dhule Municipal Election 2018 : धुळे महानगरपालिकेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरूमुस्लिम बहुल भागातील केंद्रावर मतदारांच्या रांगातृतीयपंथीयांनीही बजावला मतदानाचा हक्क


धुळे-महानगरपालिकेच्या १९ प्रभागातील ७४ जागांसाठी रविवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत १४.२८ तर दुपारी १ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान झाले होते. सर्वच केंद्रावर मतदान शांततेत सुरू आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी ७४ जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी ३५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  सकाळी  ७.३० वाजेपासून सुमारे ४५० केंद्रावर मतदान सुरू झालेले आहे. सकाळी थंडीमुळे मतदानाला अल्प प्रतिसाद होता. ९ वाजेनंतर मतदार मतदान करण्यास बाहेर पडले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत १४.२८ तर  दुपारी १ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान झाले होते. यात मुस्लिम प्रभागातील केंद्रावर  मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. शहरानजीक असलेल्या चितोड केंद्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ३० टक्के तर मोराणे येथे १४ टक्के मतदान झाले होते.  शहरातील काही केंद्रावर दुपारी १२ वाजेपासून गर्दी वाढलेली होती. सर्वच केंद्रावर मतदान शांततेत सुरू होते.सुरक्षितता म्हणून भरारी पथक प्रत्येक केंद्राला भेट देत होते.
आमदार अनिल गोटे यांनीही केले मतदान
अज्ञात व्यक्तिंकडून शनिवारी रात्री आमदार अनिल गोटे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. याघटनेंतर आमदार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. रविवारी सकाळी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आमदार गोटे यांनी महाराणा चौकातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
तृतीयपंथीयांनी केले मतदान
महापालिकेच्या निवडणुकीसाठी १३ तृतीयापंथींपैकी ८ तृतीयपंथीयांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.


 

Web Title: For Dhule Municipal Corporation, 16 percent polling till 1 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.