धुळे मनपाच्या महासभेत शासनासह मजीप्रावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:34 PM2017-11-28T16:34:21+5:302017-11-28T16:36:09+5:30

मल:निस्सारण योजना वर्ग करण्यास विरोध

In Dhule Municipal Corporation's General Assembly, there is a attack on the Majpraver General Assembly | धुळे मनपाच्या महासभेत शासनासह मजीप्रावर हल्लाबोल

धुळे मनपाच्या महासभेत शासनासह मजीप्रावर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देमनपा हिस्सा टाकण्याशिवाय कोणतेही वाढीव शुल्क द्यावे लागणार असेल तर मनपाचा योजना वर्ग करण्यास तीव्र विरोध असल्याचे रूलिंग महापौर कल्पना महाले यांनी दिले़ मलेरिया विभागात कर्मचारी भरतीवरून सहायक आयुक्तांवर झालेल्या आरोपांमुळे आयुक्तांनी सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सदस्य व आयुक्तांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  शहरासाठी मंजूर झालेल्या भुयारी गटार अर्थात मल:निस्सारण योजना जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करून सलग दुसºया योजनेची वाट लावण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत शासनासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मनपा महासभेत जोरदार हल्लाबोल करण्यात आला़
महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत झाली़ 
शहरासाठी मंजूर झालेली १३१ कोटींची मल:निस्सारण योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्याबाबतचा ठराव मागविला आहे़ त्यानुषंगाने सदर विषय महासभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आला होता़ सदर योजना वर्ग करण्यास जोरदार विरोध करण्यात आला़ शासनाने राजकारण शिजवून योजना वर्ग करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा सदस्य सतिष महाले यांनी केला़ तर राज्यातील सर्व महापालिकांमध्ये केवळ धुळे मनपाची योजना अन्यत्र वर्ग करून शासनाने मनपाचा अपमान केल्याची टिका सदस्य चंद्रकांत सोनार यांनी केली़ मनपाच्या स्वायत्तेवर शासन घाला घालत असल्याचे सदस्य चंद्रकांत केले म्हणाले़ तर नरेंद्र परदेशी यांनी कायदा शासनाच्या बापाचा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली़ संजय गुजराथी यांनी बॅनर झळकावून मजीप्राच्या विविध योजनांची बिकट स्थिती सर्वांसमोर आणली़ याशिवाय मनोज मोरे, विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, सुभाष जगताप, अमोल मासुळे, कैलास चौधरी यांनी देखील मजीप्राच्या कामावर नाराजी व्यक्त करीत योजना वर्ग करण्यास विरोध केला़ 

Web Title: In Dhule Municipal Corporation's General Assembly, there is a attack on the Majpraver General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.