धुळे महापालिका कर्मचाºयांचे आंदोलन ९ मार्चपर्यंत स्थगित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 05:15 PM2018-02-27T17:15:28+5:302018-02-27T17:15:28+5:30
कराच्या रक्कमेतून वेतन आयोगाचा लाभ देण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महानगरपालिका कर्मचाºयांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय होता़ मात्र बुधवारी रात्री उपायुक्त रविंद्र जाधव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कामबंद आंदोलन ९ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय कर्मचारी समन्वय समितीने घेतला आहे़
मनपातील कायम कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाचा तर फंडातील कर्मचाºयांना पाचव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येत आहे़ मात्र मनपातील काही ठराविक कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचाºयांना अजूनही वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही़ महापालिका प्रशासनाने आधी वर्ग ४ मधील सेवानिवृत्त त्यानंतर कार्यरत, वर्ग ३ मधील सेवानिवृत्त व त्यानंतर कार्यरत कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता़ त्याबाबतचे लेखी आश्वासन मनपा कर्मचारी समन्वय समितीला देण्यात आले होते़ पण अंमलबजावणी न झाल्याने कर्मचारी समन्वय समितीने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता़ परंतु तत्पूर्वी उपायुक्त रविंद्र जाधव यांनी ९ मार्चपर्यंत जमा होणाºया महसूलातून कर्मचाºयांच्या थकीत रकमा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन समितीला दिले़ त्यामुळे कामबंद आंदोलन ९ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष सुनिल देवरे यांनी स्पष्ट केले आहे़