धुळे मनपा वसुली विभागाचा ‘कारभार’ चव्हाटय़ावर!
By admin | Published: July 7, 2017 01:04 PM2017-07-07T13:04:37+5:302017-07-07T13:04:37+5:30
पदे काढून घेण्याची निरीक्षकांची मागणी, तीन निरीक्षकांना बडतर्फ करण्याची नोटीस
Next
>ऑनलाईन लोकमत
धुळे , दि.7 - महापालिकेने गेल्या वर्षी केलेल्या 92 टक्के करवसुलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतानाच गुरुवारी वसुली विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आह़े वसुली विभागातील प्रभारी कर निरीक्षकांनी सहायक आयुक्तांना पत्र देऊन तक्रारींचा पाढा वाचला आह़े तर सहायक आयुक्तांनी तीन निरीक्षकांना नोटिसा बजावून चक्क बडतर्फ का करण्यात येऊ नये? अशी विचारणा केली आह़े
92 टक्के करवसुलीवर प्रश्नचिन्ह!
धुळे महापालिकेच्या करवसुली विभागाचा इतिहास कमालीचा वादग्रस्त आह़े सतत काहीना काही वाद या विभागात समोर येत असतात़ मनपाकडे मागणीचा अचूक आकडाच उपलब्ध नसताना 92 टक्के करवसुली कशी झाली? अशी विचारणा नुकत्याच झालेल्या महासभेत झाली होती़ त्याबाबत खुलासा होण्यापूर्वीच नवीन प्रकरण समोर आले आह़े
मालमत्ता सव्रेक्षणाचे आदेश
मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लागलीच वसुली विभागाची बैठक घेतली होती़ या बैठकीत प्रत्येक वसुली निरीक्षक व लिपिकांना आपापल्या भागातील नोंद नसलेल्या मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होत़े त्यासाठी 30 जूनर्पयत मुदतदेखील देण्यात आली होती़ मात्र मुदत संपूनही सव्रेक्षण झाले नाही़ आयुक्तांनी 7 जुलैर्पयत मुदत वाढवून दिल्यानंतर वसुली विभागात काम सुरू झाल़े