धुळे महानगरपालिकेच्या शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:41 AM2019-03-15T11:41:39+5:302019-03-15T11:42:46+5:30
शिक्षकांनी निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या दहा वर्षांपासून आम्ही बीएलओचे काम करीत असून, आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा, गुणपत्रिका तयार करणे आदी कामे असल्याने, बीएलओच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी महानगरपालिकेच्या शिक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भामरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका शाळांमध्ये पुरषांऐवजी महिला शिक्षकांची संख्या जास्त आहे. त्यांनाही बीएलओची कामे देण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेणे, परीक्षेचे मुल्यमापन, लेखी-तोंडी गुणनोंदी, गुणपत्रिका तयार करणे, त्यांचा निकाल जाहीर करणे आदी कामे आहेत. शैक्षणिक वर्ष अंतिम टप्यात असून, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, पुढील वर्षांसाठी शाळेत दाखल पात्र व बाह्य विद्यार्थी यांचा शोध घेण्यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळा परिसरात कुटुंब सर्वेक्षण करणे आदी कामे आहेत. त्यातच सर्वच शिक्षकांना बीएलओचे काम देण्यासाठी आदेशाचे फोन येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या प्रशिक्षणात सर्व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांना निवडणुकीची ड्युटीही दिली जाणार आहे. वरील सर्व जबाबदाऱ्या लक्षात घेऊन शिक्षकांना बीएलओच्या कामातून सूट देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. निवेदनावर वसीमराजा अमानुल्लाह खाटीक, शे.रईस शे. शफीरूद्दीन, साबीरशेख, साकिर शेख, शे.फारूख कमरोद्दिन, निसार अहमद, अलीरजा गफ्फार खान, अशपाक अहमद सईद अहमद, कलीम अख्तर मो.सलीम, मो. असद मो.इसाद आदींच्या स्वाक्षºया आहेत.