धुळे-नंदुरबार जिल्हा बँकतर्फे 20 टक्के शेअर्स रकमेवर आक्षेप

By admin | Published: April 23, 2017 01:44 PM2017-04-23T13:44:05+5:302017-04-23T13:44:05+5:30

धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेतर्फे वि.का.सोसायटय़ांकडूनच शेअर्सच्या नावाने 20 टक्के रक्कम जमा करून सोसायटय़ांनाच डबघाईस आणण्यासाठी प्रय}

Dhule-Nandurbar District Bank's objection to 20% of the shares | धुळे-नंदुरबार जिल्हा बँकतर्फे 20 टक्के शेअर्स रकमेवर आक्षेप

धुळे-नंदुरबार जिल्हा बँकतर्फे 20 टक्के शेअर्स रकमेवर आक्षेप

Next

ऑनलाइन लोकमत / रमाकांत पाटील

नंदुरबार, दि. 23 - राज्यातील विविध कार्यकारी सोसायटय़ांना बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा बँकांनी आर्थिक गुतंवणूक करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी काढला असताना धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेतर्फे वि.का.सोसायटय़ांकडूनच शेअर्सच्या नावाने 20 टक्के रक्कम जमा करून सोसायटय़ांनाच डबघाईस आणण्यासाठी प्रय} केला जात असल्याने त्याबाबत सभासदांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सोसायटय़ांच्या खात्यातील रक्कम परस्पर बँक वर्ग करून घेत असल्याने याबाबत आता सोसायटय़ांनी न्यायालयातच दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
धुळे-नंदुरबार जिल्हा बँक ही गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक तोटय़ात आहे. गेल्यावर्षाअखेर बँक 88 कोटी तोटय़ात आहे. त्यामुळे बँकेतर्फे सोसायटय़ांना कर्ज पुरवठा करतांना अनेक जाचक अटी लादल्या जात असल्याचा आरोप आहे. या बँकेने ऊस उत्पादक सभासदांना तीन वर्षापासून कर्ज देणे बंद केले आहे. तसेच नवीन सभासदांनाही बँकेतर्फे कर्ज पुरवठा होत नाही. एकरक्कमी कजर्फेड योजनेअंतर्गत व्याजात सूट देण्याबाबत गवगवा होत असला तरी प्रत्यक्षात कर्ज रक्कमेवर मात्र फरक लागू करीत नाहीत. शासनाने शिफारस केलेल्या पीक कर्ज दराप्रमाणे बँक कर्ज वाटप करीत नाही असाही विविध कार्यकारी सोसायटय़ांचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर संस्थेला कर्ज पुरवठा करीत असतांना शेकडा 20 टक्के याप्रमाणात  बँकेचे शेअर्स घेणे बंधनकारक केलेले आहे. वास्तविक सतत 30 वर्षापासून ही बँक तोटय़ात असल्याने याआधीच जे भागभांडवलीची रक्कम बँकेकडे जमा आहे त्यावर बँकेने आतार्पयत पावआणा देखील डिव्हींडंट दिलेला नाही. त्यामुळे हा निर्णय सोसायटय़ांना डबघाईस आणणारा असल्याचे संस्थाचालकांचे मत आहे. कारण शेतक:यांच्या 20 टक्के शेअर्स रक्कम कपातीला विरोध आहे. शिवाय शेतक:यांकडून सोसायटी जी शेअर्स रक्कम घेते त्यावर शेतकरी सभासद दरवर्षी डिव्हीडंट मागतात. त्यामुळे संस्थेला बँकेचे नियम जाचक असल्याचे वाटतात.
एकुणच जिल्हा बँकेने सोसायटय़ांशी ज्या पद्धतीने व्यवहार सुरू केला आहे त्यावर संस्थाचालक आता आक्रमक होऊ लागले आहेत. एकीकडे बँकेकडे सोसायटय़ांचे इमारत फंड व रिझव्र्ह फंडाचे कोटय़ावधी रुपये जमा आहे. शिवाय भागभांडवलची रक्कमही मोठय़ा प्रमाणावर जमा आहे. ही रक्कम सोसायटय़ांना परत मिळेल की नाही याबाबत साशंकता लागून असतांना पुन्हा 20 टक्के शेअर्स रक्कम दिल्यास ती रक्कम परत मिळेल याची शाश्वती काय? असा प्रश्न संस्थाचालक व सभासदांना लागून आहे. त्यामुळे यासंदर्भात संस्थाचालकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली असून त्याची राज्य शासनाने हमी घ्यावी अशी मागणी केली आहे. तसेच बँकेने गेल्या तीन ते चार वर्षात संस्थांचा स्वनिधीची रक्कम संस्थेच्या चालू खात्यातून संस्थेची कुठलीही मंजुरी न घेता परस्पर बँक शेअर्स खाती वर्ग केले आहे. त्याचीही चौकशीची मागणी केली आहे.
संस्थाच्या पोटनियमात तफावत कशी?
4विविध कार्यकारी सहकारी सोसायटय़ांच्या पोटनियमात दहा टक्के र्पयतच भागभांडवलीची रक्कम घेण्याचा नियम आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेने 20 टक्केर्पयत शेअर्स भागभांडवलीचा ठराव केला आहे. त्यामुळे सोसायटय़ा आणि बँक यांच्यातील या तफावतीमुळे सोसायटय़ा अडचणीत आल्या आहेत. कारण सोसायटय़ांना दहा टक्के पेक्षा अधीक शेअर्स रक्कम सभासदांकडून घेता येत नाही. तर दुसरीकडे 20 टक्के शेअर्स रक्कम केल्याशिवाय बँक कर्ज देणार नाही. या कोंडीमुळे वि.का.सोसायटय़ा डबघाईस जाण्याची शक्यता आहे.  शिवाय एवढे शेअर्स भांडवल देवून सभासदांनाही कर्ज न परवडणारे आहे. त्यामुळे सभासद देखील सोसायटय़ांकडून कर्ज घेण्याऐवजी राष्ट्रीयकृत बँकाकडे जातील. सोसायटयांच्या सभासदांनी राजीनामा दिल्यास सोसायटय़ांचे अस्तित्वच संपण्याचीही भिती व्यक्त होत आहे.
संस्थाचालकांचा एल्गार
सहका आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी जिल्हा बँकांनी सभासदांना तत्पर सेवा द्यावी व सोसायटय़ांचे बळकटीकरण करण्याचे आदेश शुक्रवारीच काढले असतांना धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचा शेअर्स रक्कम व इतर भुमिका अन्यायकारक असून सोसायटय़ांना डबघाईस आणणारे असल्याचा आरोप करीत 52 सोसायटय़ांच्या संस्थाचालकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

शेअर्सची रक्कम ही नियमानुसारच घेतली जात आहे. बँक आणि शेतकरी टिकावा यासाठीच पाऊले उचलली जात आहे. सोसायटय़ांची रक्कम परस्पर बँकेने वर्ग केल्याचा जर सोसायटय़ांचा आरोप असेल तर त्याबाबत नियमानुसार चौकशी केली जाईल. सोसायटय़ांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शेतक:यांना कर्ज पुरवठा करायचा असेल तर शेअर्स रक्कम भरणे आवश्यक आहे.
-धीरज चौधरी, सीईओ, धुळे-नंदुरबार जिल्हा बँक

Web Title: Dhule-Nandurbar District Bank's objection to 20% of the shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.