धुळे-नंदुरबार जिल्हा बॅँकेपुढे शिवसेनेचे ढोल वाजवा आंदोलन

By admin | Published: July 10, 2017 06:06 PM2017-07-10T18:06:33+5:302017-07-10T18:06:33+5:30

पात्र शेतक:यांची नावे जाहीर करण्याची मागणी. जिल्हा बॅँकेच्या सीईओंशी चर्चा

Before the Dhule-Nandurbar district, Shivsena's drum-blowing movement | धुळे-नंदुरबार जिल्हा बॅँकेपुढे शिवसेनेचे ढोल वाजवा आंदोलन

धुळे-नंदुरबार जिल्हा बॅँकेपुढे शिवसेनेचे ढोल वाजवा आंदोलन

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.10- सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून कर्ज माफी जाहीर झालेल्या शेतक:यांची यादी जाहीर करावी, या मागणीकरीता जिल्हा शिवसेनेतर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिका:यांशी नेत्यांनी चर्चाही केली. 
सकाळी 11 वाजता धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या गरुड बागेत असलेल्या मुख्य कार्यालयासमोर पक्षाचे उपनेते अनंत तरे, संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख डॉ.माधुरी बाफना, नंदुरबार लोकसभा संघटक भगवान करनकाळ, धुळे लोकसभा संघटक महेश मिस्तरी, महानगर प्रमुख सतीष महाले, उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील, उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक संजय गुजराथी, मनपा विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, तालुका प्रमुख मनिष जोशी आदी उपस्थित होते. 

Web Title: Before the Dhule-Nandurbar district, Shivsena's drum-blowing movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.