धुळ्यातील ऑनलाईन फसवणुकीचे धागेदोरे बिहार, झारखंडकडे!

By admin | Published: April 18, 2017 05:59 PM2017-04-18T17:59:15+5:302017-04-18T17:59:15+5:30

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या 5 घटना घडल्या आहेत़ याकामी तपासासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आह़े

Dhule online fraud cases in Bihar, Jharkhand! | धुळ्यातील ऑनलाईन फसवणुकीचे धागेदोरे बिहार, झारखंडकडे!

धुळ्यातील ऑनलाईन फसवणुकीचे धागेदोरे बिहार, झारखंडकडे!

Next

 धुळे,दि.18- जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या 5 घटना घडल्या आहेत़ याकामी तपासासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आह़े तपासाच्या सुरुवातीलाच बिहार आणि झारखंड या दोन राज्याकडे धागेदोरे जात असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली़ 

आपण बँकेतून बोलत आहोत़ आपला आधार क्रमांक द्या, पॅन नंबर द्या, माहितीचे संकलन सुरु आह़े अशी बतावणी करत असतानाच एटीएमचा नंबर, पासवर्ड क्रमांक सुध्दा बोलण्याच्या नादात घेतला जातो़ नंबर सांगितल्यानंतर दुस:या क्षणात आपल्या बँक खात्यावरील रक्कम परस्पर लंपास झाल्याच्या घटना आता पुढे येऊ पहात आहेत़ 
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात 5 घटना घडल्या आहेत़ धुळे शहर पोलीस ठाणे, मोहाडी पोलीस ठाणे, आझादनगर पोलीस ठाणे, देवपूर पोलीस ठाणे आणि शिंदखेडा पोलीस ठाणे अशा पाच ठिकाणी नोंद झालेली आह़े 
ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल केली असता एकत्रित लंपास झालेली रक्कम सुमारे दीड लाखांच्या आसपास आह़े त्यात कोणाचे 30 हजार, कोणाचे 50 हजार याप्रमाणे रक्कमा असल्याचे सांगण्यात आल़े 

Web Title: Dhule online fraud cases in Bihar, Jharkhand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.