धुळे पंचायत समिती सभापतींविरूद्धचा अविश्वास ठराव १६ विरूद्ध ३ मतांनी फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:03 PM2018-02-21T19:03:31+5:302018-02-21T19:04:58+5:30

कॉँग्रेसचे बाजूने तर राष्टÑवादीचे विरोधात मतदान, शिवसेना तटस्थ

Dhule Panchayat Committee rejects unanimity resolution against 16, rejects 3 votes against 3 votes | धुळे पंचायत समिती सभापतींविरूद्धचा अविश्वास ठराव १६ विरूद्ध ३ मतांनी फेटाळला

धुळे पंचायत समिती सभापतींविरूद्धचा अविश्वास ठराव १६ विरूद्ध ३ मतांनी फेटाळला

Next
ठळक मुद्देविशेष सभेत सदस्यांचे हात उंचावून मतदान अविश्वास ठराव १६ विरूद्ध ३ मतांनी फेटाळला १० सदस्य अनुपस्थित, परिसरात दंगा काबू पथकाचा बंदोबस्त 

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : येथील पंचायत समिती सभापती अनिता पाटील यांच्याविरूद्ध दाखल अविश्वास ठराव १६ विरूद्ध ३ मतांनी फेटाळला गेला.गुरूवारी दुपारी १२ वाजता या संदर्भात झालेल्या विशेष सभेत ठरावाच्या बाजूने १६ तर विरोधात ३ मते पडली. दोन सदस्य तटस्थ राहिले. सभागृहात ३१ पैकी केवळ २१ सदस्य उपस्थित तर १० सदस्य अनुपस्थित राहिले. 
पंचायत समितीच्या २३ सदस्यांनी सभापती अनिता पाटील यांच्याविरूद्ध २ रोजी जिल्हाधिकाºयांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, हा प्रमुख करून सदस्यांनी हा ठराव दाखल केला होता. त्यात इतर कारणेही नमूद केली होती. यावर जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी सदर ठरावावर २१ रोजी दुपारी १२ वाजता विशेष सभा घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे बुधवारी दुपारी विशेष सभा झाली. 
उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ पीठासन अधिकारी होते. त्यांच्यासोबत तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, सहायक गटविकास अधिकारी गौतम सोनवणे, परिविक्षाधीन नायब तहसीलदार डॉ.संतोष मुंढे उपस्थित होते. 
यावेळी ३१ पैकी २१ सदस्य उपस्थित होते. यावेळी ठरावावर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात ठारावाच्या बाजूने उजवा हात तर विरोधात डावा हात उंचावयाचा होता. त्यात कॉँग्रेसचे उपसभापती दिनेश भदाणे, शिरधाने प्र.नेर, पुष्पलता वाणी, लामकानी, प्रभाकर गवळे, नंदाणे, उषा माळी, कापडणे, मुकेश पवार, न्याहळोद, सुनंदा मराठे, वरखेडी, पुष्पाबाई पाटील मोहाडी प्र.डांगरी, प्रमोद पाटील, गोंदूर (निमडाळे), जिजाबराव पाटील, फागणे, भगवान चौधरी, मुकटी, गुलाबराव कोतेकर, शिरूड, सुनील मराठे, चिंचखेडा, निर्मलाबाई  देवरे, आर्वी, सरस्वतीबाई वाघ,  सडगाव व सुवर्णा पाटील, निमगूळ, व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या इंदूबाई तावडे या १६ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर सभापती राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अनिता पाटील, संजय शिंदे, मेहेरगाव व रामचंद्र पाटील, देऊर बु।।. यांनी मतदान केले. तर शिवसेनेच्या मोराणे प्र.लळींग येथील सदस्या सुनीता वाघ व भाजपच्या मंगलाबाई पवार, मोघण हे तटस्थ राहिले. 
१० सदस्य राहिले अनुपस्थित - या विशेष सभेला शिवसेनेचे सदस्य मीनाबाई देवरे, बोरीस, रूपाली माळी, सोनगीर, भगवान भिल, कुसुंबा, भिवसन उर्फ किसन गायकवाड, खेडे, जबनाबाई सोनवणे, नेर, अंबर मोरे, अवधान, ज्ञानेश्वर पाटील, बाळापूर, सखाराम पाटील, बोरविहीर, अपक्ष सोनी भिल, बिलाडी, भाजपच्या सुरजाबाई ठाकरे हे १० सदस्य अनुपस्थित होते.  

 

Web Title: Dhule Panchayat Committee rejects unanimity resolution against 16, rejects 3 votes against 3 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.