धुळे पोलिसांकडून ९ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 09:33 PM2019-12-31T21:33:41+5:302019-12-31T21:34:08+5:30

उभंड येथील सराईत जेरबंद : २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

Dhule police seize two bikes | धुळे पोलिसांकडून ९ दुचाकी हस्तगत

धुळे पोलिसांकडून ९ दुचाकी हस्तगत

Next

धुळे : शहर पोलिसांच्या शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी चोरीला गेलेल्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले़ त्याची किंमत २ लाख ८० हजार असून याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़
शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग व वॉच ठेवत संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते़ धुळे तालुक्यातील उभंड येथील सराईत मोटारसायकल चोर दिनेश मधुकर वाघ हा पुन्हा सक्रीय झाला असून त्याच्याकडे नेहमी नवनवीन मोटारसायकली पाहण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती़ या माहितीच्या आधारे त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते़ त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने धुळे व नाशिक येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली़ त्याने चोरी केलेल्या ९ दुचाकीची किंमत २ लाख ८० हजार रुपये आहे़ त्याच्याकडून ९ दुचाकी देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहेत़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे आणि त्यांच्या पथकातील हिरालाल बैरागी, नाना आखाडे, भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, संदिप पाटील, सतिश कोठावदे, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड, राहुल गिरी यांनी ही कामगिरी केली़ त्याच्याकडून अजुन दुचाकी मिळण्याची शक्यता आहे़

चोरीस गेलेल्या मोटार सायकली संदर्भात पडताळणीकामी संबंधितांनी संपर्क साधावा़
- राजकुमार उपासे
पोलीस निरीक्षक, धुळे शहर

Web Title: Dhule police seize two bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे