धुळे मतदार संघात ५७ टक्के मतदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:07 PM2019-04-29T23:07:24+5:302019-04-29T23:14:42+5:30
ईव्हीएमचा बिघाड, मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ कायम
लोकमत आॅनलाईन
धुळे : लोकसभा निवडणुकीसाठी २८ रोजी झालेल्या मतदानादरम्यान धुळे मतदार संघात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ५७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर उत्साह दिसून येत होता. जिल्ह्यात काही ठिकाणी रांगा लागल्या तर काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात मतदार आपला हक्क बजावत होते. त्यानुसार पहिल्या दोन तासात सकाळी ९ वाजेपर्यंत धुळे लोकसभा मतदार संघात ५.६७ टक्के मतदान झाले. त्यांनतर ११ वाजेपर्यंत २९.७५ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ४०.५१ टक्के तर ४ ते ५ वाजे दरम्यान ५०.०८ टक्के मतदान झाले होते़
वाढत्या तापमानामुळे सकाळी मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसत होता़ मात्र सायंकाळी ४ वाजेनंतर मतदान केद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होते़ त्यामुळे सायंकाळपर्यत ५७ टक्के मतदान होते़
मतदान केद्रांवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील काही मतदान केंद्रावर प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनाद करण्यात आला होता़
२८ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’!
धुळे मतदार संघासाठी ३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी व माघारीनंतर २८ उमेदवार रिंगणात राहिले. डॉ़ सुभाष भामरे (भाजप), कुणाल पाटील (कॉँग्रेस), संजय अपरांती (बहुजन समाज पार्टी ) कुणाल पाटील ( कॉँग्रेस) सुभाष रामराव भामरे (भाजपा) अनिल गोटे (लोकसंग्राम) अनिल जाधव (बळीराजा पार्टी ) मोहम्मद अन्सारी (मायनॉरिटीज सुरक्षा महासंघ) ताहेर सत्तार खाटीक (राष्टÑीय मराठा पार्टी) दिलीप पाटील (बहुजन मुक्ती पार्टी ) नबी अहमद अहमद दुल्ला (वंचित बहुजन आघाडी) नंदकुमार चव्हाण (राष्टÑीय जनसेना पार्टी ) पंढरीनाथ मोरे (भारतीय ट्रायबल पार्टी ) जैनुद्दीन पिंजारी (बहुजन महापार्टी ) हिना मेवाती (भारतीय पार्टी ) सीताराम वाघ (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) इरफान मो.इसहाक (अपक्ष) एकबाल मो.रफिक (अपक्ष)कास्मी कमाल (अपक्ष) धीरज चोरडिया (अपक्ष) अय्युबखान तडवी (अपक्ष ) दिनेश कोळी (अपक्ष) नसिम रऊफ बाबा खान (अपक्ष) नितीन खरे अपक्ष, सलीम पिंजारी (अपक्ष) सुभाष वसंत भामरे (अपक्ष) मेराज बी हुसेन खान (अपक्ष) मोहम्मद रिजवान (अपक्ष) ज्ञानेश्वर ढेकळे (अपक्ष) यांचे भाग्य सीलबंद झाले. दरम्यान, २३ मे रोजी धुळे येथील नगावबारी परिसरात मतमोजणी होेणार आहे. त्यामुळे मतदारांना आता धुळ्याचा खासदार नेमका कोण होणार याकडे लक्ष लागुन आहे़
कापडणे केंद्रात साडेसहापर्यत मतदान
कापडणे येथे सायंकाळपर्यत मतदान प्रक्रिया सायंकाळी साडेसहा वाजेपर्यत सुरू होते़ त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यत मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा दिसून आल्या़ त्यामुळे ६१.१७ टक्के मतदान झाले आहे.
बभळाज येथे सव्वा सातपर्यत मतदान
बभळाज येथे आदिवासी समाजात लग्न व मजूर शेतात गेल्यामुळे रात्री सव्वा सात वाजेपर्यत मतदान सुरू होते़ त्यामुळे ६८.३६ टक्के मतदान झाले होते़