धुळ्याचे कृषी विज्ञान केंद्र व्हावे : मिनी विद्यापीठ कुलगुरूंची अपेक्षा : सल्लागार समितीची ऑनलाईन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:11+5:302021-05-30T04:28:11+5:30
बैठकीला विस्तार शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. शरद गडाख, पुणे येथील अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी ...
बैठकीला विस्तार शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. शरद गडाख, पुणे येथील अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यातील पीक पद्धतीनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. विषमुक्त शेतीकडे वाटचाल करताना सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व व भविष्यात सेंद्रिय शेतीला असलेला वाव यांची माहिती देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. शरद गडाख म्हणाले की, कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर शेती पद्धतीचे मॉडेल तयार करून शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीने या मॉडेलचा अंगीकार करून उत्पन्नात वाढ करावी. विद्यापीठाच्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसारासाठी खरीप व रब्बी हंगामात तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करावे. तसेच सेंद्रिय शेती पद्धतीचे मॉडेल तयार करून आदर्श गाव उभारावे, असेही ते म्हणाले. शास्त्रज्ञ जगदीश काथेपुरी यांनी सूत्रसंचालन केले. रोहित कडू यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. पंकज पाटील, प्रा. डॉ. धनराज चौधरी, प्रा. डॉ. अतीश पाटील, प्राची काळे, जयराम गावित, स्वप्निल महाजन, बाळू वाघ, कुमार भोये, आदींनी प्रयत्न केले.
या वेळी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या विभागवार कामांचे सादरीकरण केले. त्यात आद्यरेखा पीक प्रात्यक्षिक, शेतातील प्रयोग, ऑनलाइन प्रशिक्षण, गटचर्चा, शेतीविषयक संदेश, सीड हब, प्रो सॉइल, कृषी विकास योजना, देसी, एफएनएस, आदींचा समावेश होता. या वेळी विज्ञान केंद्राच्या देशी गोवंश व गुलाबी बोंड अळी नियंत्रण या घडीपत्राचे प्रकाशन केले. हितेंद्र गिरासे, रेणुकाताई चव्हाण, उमेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
नाबार्ड बँकेचे जिल्हा प्रबंधक विवेक पाटील, ‘आत्मा’चे उपसंचालक एस. डी. मालपुरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. एच. एम. खलाणेकर, सहकार व पणन विभागाचे विभागीय व्यवस्थापक संदीप गोराडे, मत्स्य विभागाचे साहाय्यक आयुक्त डॉ. गिरीश गाताडे, अग्रणी बँकेचे मोहन दास, आकाशवाणीचे रोशन जाधव, एस. ए. भामरे, प्रसाद महाजन, सुरेश दाडके, प्रा. डॉ. दत्तात्रय कुसाळकर, प्रा. डॉ. सुदाम पाटील, प्रा. डॉ. राहुल देसले, प्रा. डॉ. कातेकर, आदींनी कृती आराखड्यांतर्गत सूचना मांडल्या.