धुळे उपजिल्हाधिका:यांची खुर्ची जप्त!

By admin | Published: June 12, 2017 03:42 PM2017-06-12T15:42:12+5:302017-06-12T15:42:12+5:30

वाढीव भरपाईची रक्कम शेतक:यांना देण्यास टाळाटाळ

Dhule subdivision: seizures of the seized! | धुळे उपजिल्हाधिका:यांची खुर्ची जप्त!

धुळे उपजिल्हाधिका:यांची खुर्ची जप्त!

Next

 ऑनलाईन लोकमत 

धुळे, दि.12 - निम्न तापी प्रकल्पात शेतक:यांच्या संपादीत जमिनीच्या वाढीव रक्कम देण्याचा आदेश  होऊन रक्कम मिळत नसल्याने शेतक:यांनी न्यायालयात धाव घेतली़ सोमवारी दुपारी पाऊणे दोन वाजेच्या सुमारास भूसंपादन उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ यांची खुर्ची जप्त करण्यात आली़ याप्रकरणी गोपालसिंग रणजितसिंग राजपूत यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती़ 
शिरपूर तालुक्यातील अजंदे बुद्रुक, नांथे, भावेर, पिंपळतांडे येथील शेतक:यांची शेतजमिन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे या प्रकल्पासाठी संपादीत झालेल्या आहेत़ त्यानुसार विशेष भूसंपादन अधिकारी वर्ग क्रमांक 1 धुळे यांनी दिलेल्या निवाडय़ाप्रमाणे 72 हजार हेक्टरीप्रमाणे रक्कम शेतक:यांना मिळालेली आह़े सदर निवाडय़ातील रक्कम ही कमी मिळाल्याने धुळे येथील दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले होत़े न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचा निकाल 12 सप्टेंबर 2013 आणि 29 डिसेंबर 2013 रोजी न्यायालयाने दिलेले आहेत़ त्याचा हुकुमनामा देखील झालेला आह़े न्यायालयाच्या हुकुमनाम्यात वाढीव भरपाईची रक्कम हेक्टरी 3 लाख प्रमाणे निकाल दिलेला आह़े हुकुमनाम्याप्रमाणे भरपाईची रक्कम शेतक:यांना मिळणे आवश्यक आह़े साडेतीन वर्ष होऊनही भरपाई मिळालेली नाही़ यासंदर्भात शेतक:यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती़ तरी देखील शेतक:यांना भरपाई मिळालेली नाही़ त्यामुळे शुक्रवारी त्यांची खुर्ची जप्त करण्याची नामुष्की ओढवली़ गोपालसिंग रणजितसिंग राजपूत, सुनील रणजित राजपूत, दशरथ मिठाराम राजपूत, योगेंद्रसिंग उमराव राजपूत, मिनाबाई उज्वल पाटील, राजेंद्रसिंग राजपूत, राजेंद्रसिंग रणजितसिंग राजपूत या शेतक:यांचा समावेश आह़े

Web Title: Dhule subdivision: seizures of the seized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.