धुळे तालुक्यातील मुकटीत सांडपाण्यावरुन वाद विकोपाला भावाने केली सख्या भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 02:17 PM2020-11-02T14:17:17+5:302020-11-02T14:17:47+5:30

गुन्हा दाखल होताच आरोपी जेरबंद, न्यायालयात हजर करणार

In Dhule taluka, a dispute broke out over sewage in Mukti | धुळे तालुक्यातील मुकटीत सांडपाण्यावरुन वाद विकोपाला भावाने केली सख्या भावाची हत्या

धुळे तालुक्यातील मुकटीत सांडपाण्यावरुन वाद विकोपाला भावाने केली सख्या भावाची हत्या

googlenewsNext

धुळे : तालुक्यातील मुकटी येथे सांडपाण्यावरुन वाद झाल्यानंतर तो मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना चाकू काढून वार केल्याने यात सख्या भावाची हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा झाली़ पहाटे १ वाजता फिर्याद दाखल झाल्यानंतर लागलीच पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास संशयिताला पकडण्यात तालुका पोलिसांना यश आले़
धुळे तालुक्यातील मुकटी येथे सुरेश भिला पाटील आणि दादा दौलत पाटील यांच्यात सांडपाण्यावरुन रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वाद झाला होता़ हा वाद मिटविण्यासाठी सायंकाळी भैय्या दौलत पाटील आणि काही जण एकत्र आले़ त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत विकोपाला जाणारा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला़ वाद मिटण्याऐवजी वाढला़ यावेळी चाकूचा सर्रासपणे वापर झाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता़ या चाकू हल्यात भैय्या दौलत पाटील, धनराज दौलत पाटील, रविंद्र धनराज पाटील यांना दुखापत झाली़ धनराज पाटील याच्या छातीवर चाकूने वार केल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली़ यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
याप्रकरणी भैय्या दौलत पाटील (३४, रा़ लक्ष्मीनगर, मुकटी, ता़ धुळे) याने सोमवारी पहाटे १ वाजता फिर्याद दाखल केल्याने संशयित दादा दौलत पाटील (२५, रा़ लक्ष्मीनगर, मुकटी ता़ धुळे) याच्या विरोधात भादंवि कलम ३०२, ३०७, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ फिर्याद दाखल झाल्यानंतर तालुका पोलिसांच्या पथकाने सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजता संशयित दादा दौलत पाटील याला अटक केली़ त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़

Web Title: In Dhule taluka, a dispute broke out over sewage in Mukti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे