धुळे तालुका पाणी टंचाई आढावा बैठक : आगामी काळात अनेक गावांना टंचाई भासणार
By अतुल जोशी | Published: May 16, 2023 06:36 PM2023-05-16T18:36:40+5:302023-05-16T18:37:57+5:30
टंचाईच्या बैठकीत तक्रारीचा पाऊस
धुळे : धुळे तालुका पाणी टंचाई आढावा बैठकीत तालुक्यात अद्याप पाणी टंचाई नसल्याचे तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांनी सांगितले. मात्र या बैठकीत अनेकांनी तक्रारींचा पाढा वाचला. बिल भरूनही वीज पुरवठा खंडीत केला जातो, पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने, मोटारी जळतात.गावात सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी अशा अनेक समस्या लोकप्रतिनिधींनी मांडल्या.
कापडणे येथील सरपंच सोनीबाई भील यांनी सांगितले की गावात सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. दर महिन्याला ग्रामपंचायतीतर्फे ५० हजार रूपये बिल महावितरणकडे भरले जाते. तरीसुद्धा काही कारणास्तव महावितरण कंपनी वीज पुरवठा खंडीत करते. त्याचा परिणाम गावाला पाणी पुरवठ्यावर होत असतो. तर महावितर कंपनीकडून कमी दाबाने वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी जळतात. मोटार दुरूस्त करायला अनेक दिवस लागातत. त्यामुळेही गावाला पाणी पुरवठा करण्यात अडचणी येतात असे अनेक गावातील सरपंचांनी सांगितले.
पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार
धुळे तालुक्यात एकाही गावात आजच्या स्थितीत टँकर सुरू नाहीत. मात्र पाऊस लांबल्यास काही गावांना पाणी टंचाई भासू शकते. यासाठी जुलै-अॲागस्ट २०२३ या दोन महिन्यासाठी पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात ३१ गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जि.प. अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी दिली
अक्कलपाडा धरणामध्ये पांझरा नदीकाठी पाणी पुरवठा करणाऱ्या २९ गावांच्या विहिरी आहेत. त्या २९ गावांमध्ये मे २०२३ अखेर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमिवर अक्कलपाडा धरणातून तीन दशलक्ष घनफूट पाणी पांझरा नदीत सोडण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमिवर अक्कलपाडा धरणातून तीन दशलक्ष घनफूट पाणी पांझरा नदीत सोडण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
मांडळ लघुप्रकल्पामध्ये, मांडळ, दोंडवाड,विंचूर, बोरकुंड, रतनपुरा, या गावांमध्ये मे २३ अखेर पाणी टंचाई निर्माण होऊ शकेल.म्हणून पाच गावांसाठी ३ दशलक्ष घनफूट पाणी बोरी नदीपात्रात सोडण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली.