धुळे - दोन गटात हाणामारी, ४० जणांवर दंगलीचा गुन्हा
By Admin | Published: October 8, 2016 09:18 PM2016-10-08T21:18:52+5:302016-10-08T21:18:52+5:30
जनावरे भरलेल्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली
>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 8 - जनावरे भरलेल्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत १२ वाहनांची नासधूस करण्यात आली असून संशयितांवर ३ वेगवेगळे दंगलीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक चैतन्या एस़ हे येथील पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. या घटनेतील सागर पाटील व जितेंद्र पाटील या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरीत सर्व आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी येथील पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे.
कट मारल्याचा जाब़़
शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सागर रामराव सोनवणे हा दिनेश बारी व विकास बारी या मित्रांसमवेत शहरातील आऱसी़पटेल मेन बिल्डींगजवळील डॉ़श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोर पाणीपुरी खात होता. त्यावेळी एका अॅपेरिक्षाने कट मारून पळ काढला़ अंधार असल्यामुळे गाडीचा नंबर दिसला नाही. तिचा पाठलाग केला असता ती गाडी मार्केट कमिटी आवारात दिसली़
सदर चालक रईस गुलाब खाटीक रा़वरवाडे यास त्यांनी कट मारल्याचा जाब विचारला असता त्याच्यासह इतर त्याच्या सोबत असलेले अरूण थोरात, विशाल थोरात, सुनिल हिरालाल वानखेडे, मनोज शिरसाठ, आकाश शिरसाठ, अजय पाटोळे, बाबा पाटोळे, संदेश थोरात, सतिष मोरे, पिंटू खैरणार, पंकज बाविस्कर, विक्की शिरसाठ असे एकूण १३ (सर्व राहणार बौध्दवाडा शिरपूर) जणांनी गर्दी जमवून हातात लाठ्या-काठ्या घेवून मारहाण केली़ तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली़
सागर सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात संशयित १३ जणांविरूध्द भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
दोन दिवसांची पोलीस कोठडी
या घटनेनंतर पोसिलानंी सागर पाटील व सुनील पाटील यांना अटक केली असून शनिवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
१२ गाड्यांचे नुकसान
सतिष मनोहर मोरे रा़वरचे गांव आंबेडकर चौक याने दिलेल्या फिर्यादीवरून १४ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ मोरे हे गाडी क्रमांक एम़एच़२०-सीटी ६६४४ लावून मार्केट आवारात उभे होते़ अचानक सागर पाटील, दीपक पाटील उर्फ भावश्या, सागर दगडू पाटील, जितेंद्र सुनिल पाटील, आनंद उर्फ वावड्या पाटील, मनोज माळी, संभा पाटील, मुन्ना माळी, भैय्या माळी, पंकज मराठे, भूषण उर्फ भटू पाटील, तुषार बारी, हरीष भोई, सचिन नाना शिरसाठ असे १४ जणांनी गर्दी गोळा करून हातातील लाकडी दांडके व दगडाने वाहनांमध्ये जनावरे घेवून जातात म्हणून तोडफोड केली़
त्यात गाडी क्रमांक एम़एच़२०-सीटी ६६४४, एम़एच़१४-सीपी-९७, एम़एच़३९-सी-६३७३, एम़एच़१८-एए-३०१०, एम़एच़०४-डीके-४९३८, एम़एच़१८-एए-४३२१, एम़एच़१८-एए-४०४३, एम़एच़१८-एए-७७४९, एम़एच़१८-एए-९३३१, एम़एच़१८-एए-६७८६, एम़एच़१८-एए-८३४९, एम़एच़१९-एस-७५४६, एम़एच़१८-एए-७६४४ या क्रमांकाच्या १२ वाहनांचे काच, ताडपत्री तोडून ४० ते ४५ हजार रूपयांचे नुकसान केले़ याबाबत सतिष मोरे याने दिलेल्या फिर्यादीवरून १३ जणांविरूध्द भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४, ५०६, मु़पोक़ाक़लम ३ (१) (३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, घटनेचे वृत्त कळल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्या एस़ यांनी येथील पोलीस ठाण्यास भेट देवून संशयित आरोपींना तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या़ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, सांगवीचे रविंद्र देशमुख, थाळनेर पोलीस ठाण्याचे तलवारे यांनी परिस्थिती हाताळली़