धुळे : शहरात प्लॅस्टिक पिशव्याचा सरार्सपणे वापर ; बंदी नावालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:56 AM2019-04-22T11:56:13+5:302019-04-22T11:57:13+5:30
महापालिका : कारवाईनंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’
धुळे : मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाºया प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे़ मात्र तरी सुध्दा शहरात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा बिनधास्त वापर होत असल्याचे दिसून येत आहे़
यांना आहे बंदी़
प्लॅस्टिकपासून तयार होणाºया पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या) तसेच थर्माकॉल व प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाºया अन्य डिस्पोजेबल वस्तु़ उदा़ ताट, कप्स, प्लेटस््, ग्लास, वाटी, चमचे, भांडे व स्ट्रॉ, नॉन वोवन प्रॉलिप्रॉपीलेन बॅग्स, द्रव पदार्थ साठविण्यात येणारे प्लॅस्टिक पाऊच/कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य यांचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, ०़५ लीटर व त्यापेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पीईटी व पीईटीई बाटल्यांचा वापर, खरेदी, विक्री, वितरण व साठवणूकीवर, आयात व वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे़
कारवाईची मोहीम नावालाच
महापालिका प्रशासनाने प्लॅस्टिकबंदी करण्यासाठी कारवाईची मोहिम शहरात राबविण्यात येते़ मात्र मात्र मोहीम संपल्यानंतर पुन्हा प्लॉस्टिक पिशव्याचा वापर सुरू होतो़ त्यामुळे कारवाईची भुमिका प्रशासनाकडून राबविण्यात आल्यानंतर देखील बंदी मोहीम शहरात यशस्वी होऊ शकली नाही़
बाजारात सर्रास होतो वापर
शहरातील पाच कंदील, आग्रारोड, देवपूर, मच्छीबाजार या परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्याचा वापर केला जातो़़ महापालिका पथकाकडून ठोस कारवाई होत नसल्याने शहरात बिनधास्तपणे पिशव्याचा वापर होत असल्याचे दिसुन येत आहे़