धुळ्यात पूर्वी कार्यक्रमांची रेलचेल असायची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:59 PM2019-09-08T12:59:38+5:302019-09-08T12:59:54+5:30
धुळे - शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची परंपरा जुनी आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर हा कटाक्षाने केला जात असे. आताच्या कर्कश वाद्यांऐवजी ...
धुळे- शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची परंपरा जुनी आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर हा कटाक्षाने केला जात असे. आताच्या कर्कश वाद्यांऐवजी ढोल, ताशे, टाळ, मृदुंग या पारंपरिक वाद्यांनी उत्सवात उत्साह सर्वत्र वाढायचा. उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. मिरच्या मारुती,भांग्या मारोती, जुने अमळनेर स्टॅन्ड, खंडेराव बाजार,महात्मा गांधी पुतळ्या जवळील मंडळ प्रतापमील कामगारांच गणपती मंडळ सहाव्या गल्लीतील महाराणा प्रताप मित्रमंडळ, फुलवाला चौकातील अष्टविनायक मित्र मंडळ आदी ठिकाणी गणपती स्थापना आकर्षणाचे केंद्र असायची.
या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जात.गणपती विसर्जनाच्या दिवशी देखील सजीव देखावे असायचे. देखावे व मिरवणूक पाहण्यासाठी एकच गर्दी होत होती. जुन्या आग्रा रस्त्यावर सायंकाळी ६ वाजेपासून जागा सांभाळण्यासाठी धडपड असायची. अगदी पंचक्रोशीतील मंडळी या मिरवणुका पाहण्यासाठी शहरात येत. पहाटे ५ पर्यंत विसर्जन सुरू राहायचे. आता उत्सव देखील बराच आधुनिक होत चालला आहे. जुन्या काळी १९८० च्या दशकातली उत्सुकता फार वेगळी होती अशी माहिती ज्येष्ठ नागरिक सुरेश थोरात (धुळे) यांनी सांगितली.