अभिरूप न्यायालय स्पर्धेत धुळ्याला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:28 AM2019-10-19T11:28:55+5:302019-10-19T11:29:16+5:30
खान्देशातील तीनही जिल्हे झाले होते स्पर्धेत सहभागी
आॅनलाइन लोकमत
धुळे : नंदुरबार येथे झालेल्या अभिरूप न्यायालय स्पर्धेत स्त्री शिक्षण संस्थेच्या एस.एम.बियाणी विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग व नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धा २०१९-२० नुकतीच एन.टी.व्ही.एस. विधी महाविद्यालय, नंदुरबार येथे पार पडली. या स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील विधी महाविद्यालयांचे सात संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेत बियाणी विधी महाविद्यालयातील प्रियंका अग्रवाल, रोहीत लुंड, दिव्या छेतीया, गौरी पाठक यांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच इंग्रजीत युक्तीवाद करून उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यामुळे या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
स्पर्धेचे परीक्षण व बक्षीस वितरण न्या. ए.डी. करभजन व जिल्हा सरकारी वकील अॅड. सुशील पंडीत यांच्याहस्ते करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना प्राचार्या विद्या पाटील, प्रा. आशिष गांगुर्डे, अॅड. राहूल मैंद. अॅड. उमेश सूर्यवंशी, अॅड. भावेश वाघमारे, अॅड. रोहीणी महाजन यांचे मार्गदर्शन तर प्रा. प्रशांत कोठारी, अपर्णा पाठक, भगवान पिंगळे, जगदीश गायकवाड यांचे सहकार्य लाभले.