धुळे जिल्हा परिषदेत फक्त तीन सदस्यांची झाली ‘रिएन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:01 PM2020-01-10T12:01:54+5:302020-01-10T12:02:10+5:30
२०१३ च्या निवडणुकीत हे तीनही सदस्य आले होते निवडून,
आॅनलाइन लोकमत
धुळे : मतमोजणी झाल्यानंतर जिल्ह्यातील गटांचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे स्पष्ट झालेले आहे. २०१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून येत गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांपैकी यावेळी फक्त तिघांचीच ‘रिएन्ट्री’ (दुसऱ्यांदा निवड) झालेली आहे. तर उर्वरित ५३ जणांमध्ये अनेक नवीन चेहरे आहे. ते प्रथमच आपल्या गटांचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर काही सदस्य ‘ब्रेक’नंतर पुन्हा जिल्हा परिषदेत विजयी होऊन आले आहेत.
बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील त्या-त्या गटांचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे स्पष्ट झाले आहे.
गेल्यावेळी जिल्हा परिषदत गटांचे प्रतिनिधीत्व करणाºया ५६ पैकी फक्त तिघांनाच सलग दुसºयांदा जिल्हा परिषदेत गटाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.
यात सुधीर सुधाकर जाधव यांचा समावेश आहे. २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेतर्फे बाळापूर गटातून निवडूक लढवून गटाचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र यावेळी बाळापूर गाव महापालिकेच्या हद्दित समाविष्ट झाल्याने, हा गटच बाद झाला. त्यामुळे सुधीर जाधव यांनी निमडाळे गटातून भाजपतर्फे निवडणूक लढवून विजयी झाले.
तसेच साक्री तालुक्यातील मंगला सुरेश पाटील या देखील सलग दुसºयावेळी आपल्या गटाचे प्रतिनिधीत्व करतील. गेल्यावेळी त्यांनी मालपूर गटातून भाजपतर्फे उमेदवारी केली होती. यावेळी गटांच्या फेररचनेत हा गट बाद झाल्याने त्यांनी बळसाणे गटातून उमेदवारी करीत विजय मिळविला आहे.
तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील हे देखील पुन्हा निवडणून आलेले आहेत. पाटील हे २०१३ मध्ये शिरपूर तालुक्यातील वाघाडी गटातून कॉँग्रेसतर्फे उमेदवारी करीत जिल्हा परिषदेत पोहचले होते. मात्र यावेळी त्यांनी भाजपत प्रवेश करून शिंगावे गटातून निवडणूक लढवित विजय मिळविला आहे. ते आता शिंगावे गटाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक नवीन चेहºयांना संधी मिळाली आहे. तर काही जणांनी यापूर्वी गटाचे प्रतिनिधीत्व केले होते. ‘ब्रेक’नंतर त्यांनी यावेळी निवडणूक लढवित पुन्हा जि.प.त प्रवेश केला आहे. त्यांच्या अनुभावाचाही लाभ सदस्यांना होणार आहे.