धुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:26 AM2019-08-27T11:26:00+5:302019-08-27T11:26:55+5:30

जिल्ह्यात वर्ग ३ ची २९९, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वर्ग -१ची चार पदे रिक्त

Dhule Zilla Parishad Health Department on Saline | धुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सलाईनवर

धुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सलाईनवर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रवर्ग ३ ची २९९ पदे रिक्तवर्ग एकची ४ पदे रिक्त

धुळे : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य स्त्री सहाय्यक, आरोग्यसेवकांसह वर्ग तीनची थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २९९ पदे रिक्त आहेत. एवढेच नाही तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वर्ग एकची चार पदे रिक्त असून, या सर्व पदांचा पदभार प्रभारी अधिकाºयांकडे देण्यात आलेला आहे. रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.
ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गरिब रूग्णांसाठी स्थानिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचाच आधार असतो. त्याठिकाणीच त्यांच्यावर उपचार होत असतात. मात्र ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणाºयांचीच जिल्ह्यात कमतरता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांवरच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे.
जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी ४१ आरोग्य केंद्र असून, २३२ उपकेंद्र आहेत.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रासाठी वर्ग तीनची एकूण ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ४९० पदे भरण्यात आलेली असून, तब्बल २९९ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात आरोग्य सहाय्यक (स्त्री)ची पदोन्नतीची एकूण ४१ पदे मंजूर असून, त्यापैकी २८ भरण्यात आलेली आहेत. तर १३ पद रिक्त आहेत. आरोग्य सेविकांची सर्वाधिक ३९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२१ भरण्यात आलेली असून, तब्बल १७४ पदे रिक्त आहेत.
आरोग्य पर्यवेक्षकांची सात पदे मंजूर आहेत. यात सरळ सेवेचे दोन व पदोन्नतीची पाच असे एकूण सात पदे आहेत. त्यापैकी सहा पदे भरण्यात आलेली असून, एकच रिक्त आहे. आरोग्य सहाय्यकाची ५९ पैकी ५३ पदे भरण्यात आलेली असून, सहा रिक्त आहेत. तर आरोग्य सेवकांची (पुरूष, अनुसूचित क्षेत्रातील ७५ पदे नवीन बृहूत आराखड्यानुसार) २७७ पदे मंजूर असतांना १२८ पदे भरण्यात आलेली असून, ९९ पदे रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारीची ४२ पैकी ४० पदे भरण्यात आलेली असून, दोन पदे रिक्त आहेत. तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञची १८ पदे मंजूर असून, १४ भरण्यात आलेली असून, चार पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी शासनातर्फे आॅनलाइन जाहिरातही काढण्यात आलेली आहे. मात्र ही प्रक्रियाही थंड बस्त्यात आहे. आॅनलाइन प्रक्रिया असल्याने, किती अर्ज प्राप्त झाले या विषयी स्थानिकस्तरावर कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार प्रभारींकडे..
आठ महिन्यांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार डॉ. सुधाकर मोरे यांनी स्वीकारला होता. मात्र त्यांची पुण्याला विनंती बदली झाली असून, गेल्या तीन आठवड्यांपासून या पदाचा पदभार डॉ. माणिक सांगळे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वर्ग एकची चार पदे आहेत. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी यांचा समावेश आहे. ही सर्व पदे रिक्त असून, या पदाचा कारभार तूर्त प्रभारी अधिकाºयांकडेच सोपविण्यात आलेला आहे. तर वर्ग -२ चे प्रशासन अधिकारी पदही रिक्त असून, त्याचाही कारभार प्रभारींकडेच आहे.

 

Web Title: Dhule Zilla Parishad Health Department on Saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे