रिक्त पदे भरण्याबाबत शैक्षणिक संस्थांपुढे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 12:15 AM2017-01-20T00:15:55+5:302017-01-20T00:15:55+5:30

अतिरिक्त शिक्षकांचे 100 टक्के समायोजन न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये नवीन शिक्षक व कर्मचा:यांच्या भरतीला ब्रेक लागला आहे.

Difficulties with educational institutions to fill vacant posts | रिक्त पदे भरण्याबाबत शैक्षणिक संस्थांपुढे अडचणी

रिक्त पदे भरण्याबाबत शैक्षणिक संस्थांपुढे अडचणी

Next


धुळे : अतिरिक्त शिक्षकांचे 100 टक्के समायोजन न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये नवीन शिक्षक व कर्मचा:यांच्या भरतीला ब्रेक लागला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण न झाल्याने वैयक्तिक मान्यतेसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश  माध्यमिक शिक्षणाधिका:यांना राज्यस्तरावरून देण्यात आले आहे.
रिक्त जागांची स्थिती
जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत 282 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याबाबत शिक्षण संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे, परंतु अतिरिक्त शिक्षक समायोजनासाठी शिक्षण विभागाकडून याला मान्यता दिली जात नाही.
संस्थाचालकांकडून भरती
त्यामुळे ब:याच ठिकाणी संस्थाचालकांनी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची भरती या रिक्त जागांवर केली आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात संस्थांनी नियुक्त केलेले शिक्षक यामुळे अतिरिक्त शिक्षकांना समावून घेण्यास संस्थाचालक टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यस्तरावरून आदेश
    जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्याशिवाय खासगी संस्थेच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेली पदे ही विषयाची गरज व आरक्षणाच्या संवर्गानुसार भरण्यास जाहिरात देण्यासाठी परवानगी देऊ नये, अशी तरतूद आहे. यासंदर्भात सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
पदे भरण्यास परवानगी
राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्याचा अधिकार संबंधित शैक्षणिक संस्थेस काही नियम व अटींवर देण्यात आला आहे. यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल करून परवानगी घेणे आवश्यक आहे.
शासनाकडून पटपडताळणी
शासनाने राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेनंतर बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखविल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे 100 टक्के समावेशन झाल्याशिवाय नवीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांची भरती करण्यात येऊ नये असे शासनाकडून आदेश देण्यात आले होते.
जोर्पयत समायोजन प्रक्रिया होत नाही तोर्पयत नवीन भरती करता येणार नाही. तसेच प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील अतिरिक्त शिक्षकांचे 100 टक्के समावेशन झाल्याचे प्रमाणपत्र  विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर केल्याशिवाय व शासन निर्णयातील समितीचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय शैक्षणिक संस्थांना रिक्त पदे भरता येणार नाही, अशाही सूचना नुकत्याच शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

जिल्ह्यातील 35 शिक्षकांचे समायोजन अजूनही बाकी
माध्यमिक विभागामध्ये एकूण 86 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी आतार्पयत 51 शिक्षकांचे अंतिम समायोजन झाले आहे. अजूनही 35 शिक्षकांचे समायोजन बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रिक्त असणा:या शिक्षकांच्या जागा भरता येत नाहीत.
नवीन जागा भरण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडे प्रस्ताव आले तरी शिक्षण विभागाकडून नवीन जागांसाठी प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रिक्त जागांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Web Title: Difficulties with educational institutions to fill vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.