धुळे जिल्ह्यातील 60 शाळांवर डिजिटलचा शिक्कामोर्तब

By admin | Published: April 17, 2017 05:56 PM2017-04-17T17:56:23+5:302017-04-17T17:56:23+5:30

सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील 1 हजार 103 शाळा या डिजिटल केलेल्या आहेत़ आता त्यापुढचा टप्पा ओलांडत त्यातील 60 शाळा संपूर्णपणे डिजिटल करण्यात यश मिळविले आह़े

Digital seal on 60 schools in Dhule district | धुळे जिल्ह्यातील 60 शाळांवर डिजिटलचा शिक्कामोर्तब

धुळे जिल्ह्यातील 60 शाळांवर डिजिटलचा शिक्कामोर्तब

Next

धुळे, दि. 17 -  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विकासाचे एक पाऊल टाकत डिजिटल प्रणालीकडे वाटचाल सुरू केलेली आह़े सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील 1 हजार 103 शाळा या डिजिटल केलेल्या आहेत़ आता त्यापुढचा टप्पा ओलांडत त्यातील 60 शाळा  संपूर्णपणे डिजिटल करण्यात यश मिळविले आह़े यात लोकसहभागाची जोड मिळाल्याने हे शक्य झाले असल्याचे जि़प़च्या प्राथमिक शिक्षणाधिका:यांनी सांगितल़े
विज्ञान युगात विद्याथ्र्याच्या पाठीवरचे ओङो कमी व्हावे, तसेच त्यांना एका क्लिकवर सर्व अभ्यासक्रमाची माहिती मिळावी, यासाठी शासनाने पुढाकार घेतला आह़े महाराष्ट्र शासनाने 22 जून 2015 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याचे स्वपA सरकारने पाहील़े यासाठी ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजिटल शाळा, कृतीयुक्त अध्यापन, आयएसओ शाळा बनविणे अशा विविध उपक्रमातून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि त्यातील विद्याथ्र्याना हायटेक बनविण्याचे काम शासनाने सुरु केलेले आह़े यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पुढाकार घेण्यास सुरुवात केलेली आह़े त्यामुळे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आल़े आजच्या स्थितीत जिल्ह्यात 1 हजार 103 पैकी 60 शाळा या संपूर्णपणे डिजिटल झालेल्या आहेत़
जिल्ह्यातील संबंधित शाळांमध्ये मल्टिमिडीया प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्याथ्र्याच्या अभ्यासक्रमावर आधारीत एज्युकेशन सॉफ्टवेअर संबंधित शाळांमध्ये उपलब्ध करुन दिले जात आहेत़ त्या शाळांतील विद्याथ्र्याना स्क्रीनवर अभ्यासक्रम आनंददायी पध्दतीने शिकविला जात आह़े शाळेत एका खोलीत एक प्रोजेक्टर निश्चित करण्यात आला असून एक प्रोजेक्टर इतरत्र वर्गात नेण्यात येत होता़ आता प्रत्येक वर्ग खोलीत स्वतंत्रपणे ही यंत्रणा विकसीत करण्यात आलेली आह़े वर्गनिहाय विद्याथ्र्याना हसत-खेळत अभ्यास शिकविला जात आह़े चित्र आणि आवाजामुळे मुलांना ते शिकून घेण्याची गोडी निर्माण होत आह़े सर्वाना चित्र दिसते, आवाज ऐकू येतो अशी सोय केली असल्याचेही देसले यांनी सांगितल़े
विशेष म्हणजे या एका डिजिटल प्रणालीसाठी किमान प्रत्येकी 85 हजार 882 रुपये इतका खर्च आलेला आह़े लोकसहभागीची जोड त्याला मिळालेली आह़े
जिल्ह्यातील शिक्षक ज्ञानरचनावाद व नवीन तंत्रज्ञानाच्या प्रेरणेने पेटून उठले आहेत़ जिल्ह्यात शैक्षणिक उठावाची क्रांती होत आहेत़ विशेष म्हणजे लोकवर्गणीतून या शाळा डिजिटल झाल्याने आता गावक:यांचा कल जिल्हा परिषद शाळांकडे अधिकाधिक वाढेल, यासाठी माझा प्रयत्न सुरु आह़े टप्प्या-टप्प्याने सर्व शाळा डिजिटल करण्याचा माझा मानस आह़े
- मोहन देसले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, धुळे

Web Title: Digital seal on 60 schools in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.