बाल वारकºयांनी काढली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:09 PM2019-07-17T12:09:25+5:302019-07-17T12:09:43+5:30

विठ्ठलनामाचा गजर : मुलांच्या पारंपारिक वेशभूषेचे आकर्षण

Dindi removed from child warrior | बाल वारकºयांनी काढली दिंडी

वाल्मिक नगरात चिमुकल्यांनी काढलेली दिंडी.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरासह तालुक्यातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले़ 
आर.सी. पटेल
शहरातील गुरूदत्त कॉलनीतील आर.सी. पटेल प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. त्यात झाडे लावा, झाडे जगवाचे संदेश देण्यात आला़ शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूक्मिनीची वेशभूषा केलेली होती. यावेळी मुख्याध्यापक आर.टी.भोई, छाया वाडीले, भारती मराठे,  एस.के.भील, शिरसाठ, शितल पाटील, हर्षदा भावसार, क्रीष्णा पावरा, प्रविण पाटील उपस्थित होते़
हिरा नगर
येथील हिरा नगरातील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने  दिंडी काढण्यात आली. वारकरी संप्रदयाची परंपरेला जोपासून  टाळ-मृदंगाचा गजर करून सकाळी दिंडीला सुरुवात झाली. परिसरातील भाविकांनी दिंडीच्या माध्यमाने विठ्ठल- रूखमाईचं दर्शन घेतले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगनराव  सोनवणे, प्रभारी मुख्याध्यापक हंसराज पाटील यांच्या हस्ते दिंडीची सुरुवात झाली. यावेळी  ज्वाला मोरे, दीपिका पाटील, कविता सोनवणे आदी उपस्थित होते़
एच.आर. पटेल
येथील एच.आर.पटेल कन्या प्राथमिक विद्यालयात आषाढी दिंडी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला़ आषाढी एकादशी निमित्ताने विद्यालयातून विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा काढण्यात आला. विद्यार्थीनींनी संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, तुकाराम, एकनाथ  यांच्या  रूपात  हजर होत्या.  इयत्ता बालवाडीच्या विद्यार्थींनींनी विठ्ठल व रखुमाई या वेषात उपस्थित होत्या. मुख्याध्यापक गणेश साळुंके यांनी ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून दिंडीचा शुभारंभ केला. 
आर.सी. पटेल मराठी शाळा
येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, माजी नगरसेवक दिलीप बोरसे, शालेय परिवहन समिती सदस्य दत्तू माळी, मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. शुभांगी बाविस्कर यांनी आषाढी एकादशी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संदीप चौधरी, गजेंद्र जाधव, जगदीश धनगर, गोपाल न्हावी यांनी चौथी वर्गातील विद्यार्थ्यांचा वृक्षमित्र ग्रृप तयार करून जागा तुमची रोपटे आमचे या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली. आदर्शनगर, सुभाष  कॉलनीतील नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घरमालकाला देण्यात आली.
बोराडी
येथील कर्मवीर इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावात वृक्षदिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा, वृक्षांचे संवर्धन व संगोपन करा अशा घोषणा देत वृक्ष लागवड संदर्भात जनजागृती केली. यावेळी  कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जिजाबराव निकम, संजय पाटील, अर्जुन पवार, स्कुलचे समन्वयक जी.ओ.पाटील, प्राचार्या पल्लवी पवार, प्राथमिकच्या प्राचार्या सविता वाल्हे आदी उपस्थित होते.

Web Title: Dindi removed from child warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे