जलयुक्त शिवार’वर आमदारांचा अविश्वास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 12:43 AM2016-01-26T00:43:48+5:302016-01-26T00:43:48+5:30
‘धुळे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची माहिती अधिकारी चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिका:यांना सादर करीत असल्याचा आरोप आमदारांनी केला़
‘धुळे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची माहिती अधिकारी चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिका:यांना सादर करीत असल्याचा आरोप करीत चारही तालुक्याच्या आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेवर अविश्वास दाखविला़ नियोजन समितीच्या बैठकीत जलयुक्त शिवार वगळता अन्य विषयांवर नावालाच विचारमंथन झाल़े जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडली़ या वेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, मनपा आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांच्यासह आमदार अनिल गोटे, जयकुमार रावल, अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, डी़एस़ अहिरे, कुणाल पाटील उपस्थित होत़े जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस 1 तास विलंबाने दुपारी चार वाजता सुरुवात झाली़ बैठकीच्या प्रारंभी आमदार अनिल गोटे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी सज्रेराव दराडे यांना तत्काळ हटविण्याची मागणी केली़ कोणालाही विश्वासात न घेता काम करणारे दराडे पुढील बैठकीत दिसता कामा नये, असे सांगत शिवाजीराव दहिते, मधुकर गर्दे व अन्य सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली़ पालकमंत्र्यांनी याबाबत शासनाकडे कारवाईची मागणी करण्याचे आश्वासन दिल़े बैठकीत आमदार अनिल गोटे यांनी जलयुक्त शिवार योजनेत पोकलॅण्ड खरेदी का झालेले नाही? असा प्रश्न उपस्थित केला़ त्यावर संबंधित विभागाच्या अधिका:यांना जाब विचारत जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी 15 फेब्रुवारीच्या आत हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल़े जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी जलयुक्त शिवार योजनेत कोणत्या विभागाला किती निधी दिला, तसेच संबंधित विभागांनी किती खर्च केला? हे तपासण्याची मागणी केली़ तर आमदार अमरिशभाई पटेल यांनी जलयुक्त शिवार योजनेचे नियोजन योग्य नसल्याचा आरोप केला़ ही योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या कृषी व वनविभागाकडे तांत्रिक मनुष्यबळ आहे किंवा नाही हे तपासण्याची मागणी पटेल यांनी केली़ आमदार कुणाल पाटील यांनीदेखील जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर नाराजी व्यक्त करीत या योजनेचा 90 टक्के निधी वाया गेल्याचा आरोप केला़ जलयुक्त शिवार योजनेत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नाही, असेही ते म्हणाल़े मधुकर गर्दे यांनी जलयुक्त योजनेसाठी होणारी शिवारफेरी अधिकारी कार्यालयात बसून करीत असल्याचा आरोप करीत सर्वाना विश्वासात घेऊन काम व्हायला हवे, असे मत मांडल़े जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याचे सांगत दुष्काळग्रस्त गावांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केल़े माजी आमदार शरद पाटील यांनी अक्कलपाडा धरणाचे पाणी गोंदूर तलावात आणण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला़ परंतु त्याबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय आला असून त्यात तांत्रिकदृष्टय़ा ही योजना योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव नामंजूर केल्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाल़े गॅङोटसाठी निधीची मागणी धुळे जिल्ह्याचे स्वतंत्र गॅङोट तयार करण्यासाठी संपादक मंडळ नियुक्त करण्याबरोबरच 10 लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी आमदार जयकुमार रावल यांनी केली़ तर मनपाचे नगरसेवक दीपक शेलार व अमोल मासुळे यांनी नगरोत्थान योजनेबाबत विचारणा केली़ मात्र मनपाच्या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल़े वीज योजनांबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली़ जिल्हा नियोजन समितीची बैठक सायंकाळी उशिरार्पयत सुरूच होती, मात्र जलयुक्त शिवार व्यतिरिक्त अन्य विषयांवर विशेष चर्चा झाली नाही़