शहीद जवानांचा दशक्रिया विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:27 PM2019-02-24T22:27:19+5:302019-02-24T22:28:06+5:30

निजामपूर : मुंडण करुन ग्रामस्थांनी वाहिली आदरांजली

Dishikari ritual of martyred soldiers | शहीद जवानांचा दशक्रिया विधी

dhule

Next

निजामपूर : साक्री तालुक्यातील निजामपूर येथे शनिवारी सकाळी शहीद जवानांचा दशक्रिया विधी व गंधमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी निजामपूर येथे रोहीणी नदीकाठी मारोती मंदिरासमोर तंबू उभारून २३ रोजी सकाळी १० वाजता दशक्रीया विधी व गंधमुक्तीचा कार्यक्रम पार पडला.
जैताणे येथील माजी सैनिक हभप भगवान दला जाधव व निजामपूर येथील खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष हभप निंबा गोपाळ चौधरी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी निंबा चौधरी व भगवान जाधव यांनी मुंडण करुन शहीदांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास परिसरातील भामेर, आखाडे, रूनमळी, जैताणे, निजामपूर येथील माजी सैनिक, सैन्यदलात कार्यरत सैनिक, वारकरी भजनी मंडळ, व्यापारी, शेतकरी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. नुकतेच पोलिस दलात भरती झालेल्या पोलिसांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शहीद जवानांना सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.

Web Title: Dishikari ritual of martyred soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे