धुळे व नंदुरबार ग.स.बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
By admin | Published: May 22, 2017 04:24 PM2017-05-22T16:24:35+5:302017-05-22T16:24:35+5:30
आरबीआयचा निर्णय : प्रशासकपदी जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकूर
Next
धुळे, दि.22- आरबीआयने धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी (ग.स.बँक) बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. ठाकूर यांनी प्रशासक पदाचा पदभारही स्विकारला आहे.
आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणे, नियमांचे उल्लंघन, बँकेच्या कामात अनियमितता या सर्व कारणांवरुन धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले असून प्रशासक पदी जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. आरबीआयचे आदेशानुसार जे.के. ठाकूर यांनी सोमवारी दुपारी बँकेच्या प्रशासक पदाचा पदभार स्विकारला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
1921 ची स्थापना
ग.स.बँकेची स्थापना 1 एप्रिल 1921 साली झाली. बँकेचे एकूण सुमारे 23 हजार सभासद आहेत. बँकेवर गटनेते चंद्रकांत देसले यांची सत्ता होती. चेअरमन म्हणून दत्तात्रय शिंदे हे काम पाहत होते. विद्यमान संचालक मंडळ हे मार्च 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर परत सत्तेवर आले होते. संचालक मंडळाची मुदत 2020 र्पयत आहे.