भांडण सोडविणा:या तरुणाचे डोके फोडले
By admin | Published: February 21, 2017 12:12 AM2017-02-21T00:12:39+5:302017-02-21T00:12:39+5:30
शिंदखेडा तालुका : दत्ताणे येथील घटना, चार जणांविरुद्ध गुन्हा
धुळे : दोघांचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाचे एकाने लाकडी दांडक्याने मारून डोके फोडले व इतरांनी मारहाण केली़ ही घटना शनिवारी रात्री शिंदखेडा तालुक्यातील दत्ताणे येथे घडली़ याप्रकरणी चार जणांविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
दत्ताणे येथील भिलाटीत राहणा:या रामदास आधार भिल (व 21) या तरुणाच्या घरासमोर 18 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास रोहिदास आधार भिल व अनिल अशोक पाटील यांच्या मेमरी कार्डवरून भांडण सुरू होत़े तेव्हा रामदास हा दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेला व मेमरी कार्ड देऊन टाक, भांडण करू नको, असे रोहिदासला सांगितल़े त्याचा राग येऊन रोहिदासने लाकडी दांडक्याने रामदास याच्या डोक्यावर मारून डोके फोडून त्याला जखमी केल़े, तर अनिल पाटील, रावसाहेब अशोक पाटील व राजू भिल (सर्व रा़दत्ताणे) या तिघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद रामदास भिल याने नरडाणा पोलीस ठाण्यात दिली आह़े
त्यानुसार वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक माळी करीत आहेत़
मध्यस्थी केल्याने वृद्धाला मारहाण
शिरपूर तालुक्यातील बभळाज गावातील हंसराज वंजारा यांच्या दुकानासमोर दोन जणांचा आपापसात वाद सुरू होता़ त्यात बन्सीलाल मानसिंग जाधव (वय 60, रा़ बभळाज) यांनी मध्यस्थी केली़ त्याचे वाईट वाटून त्यांना रोहिदास साईदास जाधव व दिगंबर शोभा जाधव (दोघे रा़बभळाज) यांनी शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच यापुढे भानगडीत पडला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्यांना दिली़ ही घटना 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली़
याप्रकरणी बन्सीलाल जाधव यांच्या तक्रारीवरून वरील दोघांविरुद्ध थाळनेर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पा़े ह़ेकॉ. चव्हाण करीत आहेत़
विषारी पदार्थ सेवन केल्याने मृत्यू
विषारी पदार्थ सेवन केल्याने उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. संतोष मळकू माळी (वय 47, रा़बिलाडी, ता़धुळे) असे मयताचे नाव आह़े त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5़45 वाजेच्या सुमारास गावाजवळ काहीतरी विषारी पदार्थ सेवन केला़ त्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुलगा सुनील माळी याने उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल़े तेथे उपचार सुरू असताना 19 रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़ डॉ़ नितीन देवरे यांनी तपासणी करून मृत घोषित केल़े याबाबत पो़कॉ. सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.