धुळ्यात रॅलीतून दिला व्यसनमुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 03:34 PM2018-03-05T15:34:32+5:302018-03-05T15:34:32+5:30

उपक्रम : मनपा शाळा क्रमांक ९ च्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

Dissemination message delivered to Rath in Dhule | धुळ्यात रॅलीतून दिला व्यसनमुक्तीचा संदेश

धुळ्यात रॅलीतून दिला व्यसनमुक्तीचा संदेश

googlenewsNext
ठळक मुद्देरॅलीचा समारोप झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा व परिसरातील कचरा व इतरत्र पडलेल्या गुटख्याच्या पुड्या संकलित करून त्याची होळी केली. यशस्वीतेसाठी मनीषा गांगुर्डे, पिंजारी परवीन, नेहा जोशी, शारदा गायकवाड, वृषाली गायकवाड, पायल शहा यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘तंबाखू व त्यापासून होणारा गुटख्याचे दुष्परिणाम या विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसन करू नये. तसेच आपला मित्र व्यसन करत असेल तर त्याला व्यसनांपासून होणाºया आजारांविषयी जागृत करून त्याचे प्रबोधन करावे, असा सल्ला त्यांनी येथे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  शहरातील मनपा शाळा क्रमांक ९ च्या विद्यार्थ्यांनी सोमवारी रॅली काढत व्यसनांपासून दूर रहावे, असा संदेश दिला. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत गुटखा व कचरा संकलित करून त्याची होळी करण्यात आली. 
 प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, नेहरू युवा मंडळ, म्हसाळे, छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था, बिलाडी यांच्या संयुक्त विद्यमाने  ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी यावेळी हिंदू एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष हिरामण गवळी, मुख्याध्यापिका  इंदिरा भोसले, उज्ज्वल बोरसे, पवन शंखपाळ, जिल्हा समन्वयक पंकज शिंदे, राजेंद्र माळी उपस्थित होते. 
घोषणांद्वारे केली जनजागृती 
मनपा शाळा क्रमांक ९ येथून रॅलीला सुरुवात झाली.  पुढे ही रॅली गल्ली क्रमांक ५, भांडे गल्ली, पारोळा रोड, पवनपुत्र विजय व्यायामशाळा मार्गे मनपा शाळा क्रमांक ९ येथे आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘गुटखा खाऊ नका’, ‘व्यसनांपासून दूर रहा’ यांसारख्या घोषणा देत येथील परिसर दुमदुमून सोडला. 

Web Title: Dissemination message delivered to Rath in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.