ग्रामस्थांना मोफत गॅस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:49 PM2020-07-31T12:49:34+5:302020-07-31T12:49:45+5:30
साक्री तालुका : बर्डीपाडा वनविभाग संयुक्त वन व्यवस्थापन समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : वन विभाग संयुक्त वन व्यवस्थापन समिती बर्डीपाडा तर्फे ग्रामस्थांना मोफत गॅस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिस जिल्हा कार्यवाहक सुभाष जगताप होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी ए आर माळके, जिप सदस्य छगन राऊत, संयुक्त वन समितीदरी पाडा अध्यक्ष वंकर कुवर, बडीर्पाडा वन समिती अध्यक्ष सुनील माळवी, उपाध्यक्ष छगन माल्या राऊत, वनपाल बच्छाव, वनरक्षक टी.एस. कुवर, डी.ए. पाटोळे, नितीन जडे , वेलजी देसाई, शंकर ठाकरे, वसंत गांगुर्डे, दिनेश राऊत, विक्रम अहिरे, सोना गॅस एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते
प्रस्ताविक वनक्षेत्रपाल अरुण माळके यांनी केले. यावेळी बर्डीपाडा संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे ४१ ग्रामस्थांना गॅस शेगडी सिलिंडर व साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि प सदस्य छगन राऊत यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की जंगल ही आदिवासींची ओळख आहे जंगलाशी नाते जोडून ठेवा जंगल तोडून तुमची प्रगती होणार नाही जंगल रोज रोजगार देणार क्षेत्रआहे झाडे परिवारातील एक व्यक्ती आहे. अध्यक्षीय भाषणातून अनिस कार्यवाहक सुभाष जगताप म्हणाले जंगलाची तोड होऊ नये म्हणून आदिवासी बांधवांना मोफत गॅस वाटप केले जात आहे.
जल, जंगल, जमीन सांभाळली तर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल निसर्गावर प्रेम करा प्रत्येकाने शेतात घरासमोर फळ झाडे लावा आदिवासी हा खरा जंगलचा राजा हे जंगल संपत्तीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असेही सांगितले.
सूत्रसंचालन व आभार वनपाल बच्छाव यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.