आदिवासी पाड्यांवर गरजूंना कपड्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:32 PM2019-03-08T22:32:08+5:302019-03-08T22:32:43+5:30
अनोखा उपक्रम : पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ई-बिल्डर ग्रुप
शिरपूर : शहरातील आर.सी. पटेल आभियांत्रिकी महाविद्यालयातील राहत २०१९ अंतर्गत द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सामाजिक कृतज्ञतेच्या जाणीवेतून आदिवासी पाड्यांवर ६०० हून अधिक महिला पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये म्हणजेच भावी अभियात्यांमध्ये सामाजिकतेची जाणीव व्हावी तसेच समाजाला काही देणे लागतो ही भावना रुजविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. पाटील, उपप्राचार्य डॉ.पी.जे. देवरे, संगणक विभाग प्रमुख डॉ.नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.