लाभार्थी विद्यार्थ्यांना तांदुळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:45 PM2020-05-06T21:45:32+5:302020-05-06T21:45:48+5:30

शिरपूर : शहरात मुलांना देखील शालेय पोषण आहार

Distribution of rice to the beneficiary students | लाभार्थी विद्यार्थ्यांना तांदुळ वाटप

लाभार्थी विद्यार्थ्यांना तांदुळ वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून इयत्ता पहिली ते सातवीच्या १२०० विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाक गृहातील शिल्लक तांदूळ समप्रमाणात वाटप करण्यात आला.
शासनाने निर्धारित केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत वर्गनिहाय फक्त ५ पालकांना शाळेत प्रवेश देण्यात आला. प्रत्येक पालकांना स्वतंत्रपणे प्लास्टिक पिशवीत पॅकिंगमध्ये सोशियल डिस्टन्सचे पालन करीत तांदूळ वाटप करण्यात आला. कोव्हीड १९ बाबत पालकांमध्ये जागृती दिसून आली. पालकांनी तोंडाला मास्क लावलेले होते.
शालेय पोषण आहार अधीक्षक पी.झेड.रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण विभाग प्रमुख मोहन चौधरी, मनोहर वाघ, आकाश देडे यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील व व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत तांदूळ वाटप करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली वर्गाचे वर्गशिक्षक आर.डी. माळी, एम.आर.सोनवणे, बी.बी.काटोले, महेंद्र माळी, वंदना सोनवणे, स्मिता साळुंखे, प्रकाश ईशी, योगेश बागुल, गजेंद्र जाधव, अविनाश राजपूत, संदीप चौधरी आदी उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, यशोदा पाटील, सतिष पाटील, सागर पवार यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of rice to the beneficiary students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे