परिचारिका संघटनेतर्फे तमाशा कलावंतांना मदतीचा आधार, साडी, किराणा कीटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:58+5:302021-06-01T04:26:58+5:30
धुळे येथे जागतिक परिचारिका दिनादिवशी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी ‘दोन मूठ धान्य गरजूंच्या मदतीसाठी’ अभियान हाती घेतले. या माध्यमातून सुरुवातीला ...
धुळे येथे जागतिक परिचारिका दिनादिवशी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी ‘दोन मूठ धान्य गरजूंच्या मदतीसाठी’ अभियान हाती घेतले. या माध्यमातून सुरुवातीला सर्वच परिचारिकांनी धान्य जमा केले. पहिल्या टप्प्यात शहरातील धुणीभांडी करणाऱ्या ५५ महिलांना परिचारिका संघटनेच्यावतीने किराणा कीट वाटप करण्यात आले. त्यानंतर गुऱ्हाळपाणी आणि निशाणपाणी येथील मोळी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या ८० परिवारांना परिचारिका संघटनेच्यावतीने किराणा कीटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शहरातील भीमनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या तमाशा कलावंत महिला आणि पुरुषांपर्यंत मदत पोहाेचविण्यात आली. दहा महिलांना साडीचोळी भेट देण्यात आली. तसेच २० कलावंतांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा घोडके, उपाध्यक्षा सुवर्णा सूर्यवंशी, तमाशा परिषदेचे शेषराव गोपाळ आदी उपस्थित होते.