१२०० कुटुंबांना कचराकुंडी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:45 PM2019-03-05T22:45:14+5:302019-03-05T22:45:52+5:30
ग्रामस्वच्छता अभियान : करवंद येथे व्यावसायिकांना देखील स्वच्छतेसाठी दिल्या कुंड्या
शिरपूर : तालुक्यातील करवंद ग्रामपंचायतीच्या ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत गावातील १२०० कुटुंबासह व्यावसायिकांना कचरा कुंडी (बादली) वाटप करण्यात आली.
महाशिवरात्रनिमित्त करवंद गावातील १२०० घरांमध्ये प्रत्येकी एका कचरा कुंडीचे (बादली) वाटप जि़प़ उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील यांच्या उपस्थितीत लोकनियुक्त सरपंच मनिषा मनिषा देवेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले़
यावेळी उपसरपंच अशोक गोरख पाटील, माजी उपसरपंच भास्कर पाटील, सुधाकर पाटील, राजकोरबाई राऊळ, अनुसयाबाई पवार, आनंदसिंग राऊळ, भाईदास पाटील, मुस्ताक अली, सुधाकर पाटील, हिरामन भील, भाग्यश्री धाकड, सोनाली कुंवर, बनुबाई भील, हीराबाई कोळी, साहेबकोर राऊळ, अरास्तोल पाटील, अनुसया पवार, ग्रामविकास अधिकारी ए़एऩपाटील, नारायण पाटील, नामदेव अहिरे, यमुनाबाई पारधी, निंबा पारधी, शिवदास गांगूर्डे, सतीष सोनार व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते़ ग्रामपंचायतमार्फत १२०० कुटुंबांसह व्यावसायिकांना कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले़
गाव अंतर्गत काँक्रींट रस्ते, गावातील ५ ही अंगणवाड्या डिजीटल केल्या आहेत़
ग्रामपंचायत इमारत वातानुकीलीत असून अत्याधुनिक, संगणक कक्ष करण्यात आले आहे़ ब्रिसलरीयुक्त शुध्द केलेले पाण्याचा जार प्रत्येकी १० रूपयाप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत दिला जात आहे़ नव्याने ४ शॉपींग गाळे बांधण्यात आले आहेत़
तिर्थक्षेत्र अंतर्गत गोरक्षनाथ मंदिर परिसराचा झगमगाट करण्यात आला आहे़ काँक्रीट रस्ते, पेवर ब्लॉक, खेळण्यासाठी पाळणे-झोले बसविण्यात आले आहे़ तसेच नवनाथ मठाला पेवर ब्लॉक बसविले आहे़ गावाजवळील अमरधाममध्ये सुमारे ३ हजार जनसमुदाय बसतील एवढी जागा, पेवर ब्लॉक, सिमेंट रस्ते, वनराई तयार करून सरंक्षण भिंत बांधल्याचे देखील लोकनियुक्त सरपंच मनिषा मनिषा देवेंद्र पाटील यांनी सांगितले़