काँग्रेसकडून जिल्हाधिका:यांना घेराव
By admin | Published: January 7, 2017 12:24 AM2017-01-07T00:24:18+5:302017-01-07T00:24:18+5:30
आंदोलन : नोटाबंदीमुळे सामान्यांना बसतोय फटका, केंद्राच्या निर्णयाचा निषेध
धुळे : नोटाबंदीला 50 दिवसांपेक्षा अधिक दिवस होऊनही प्रश्न सुटलेला नाही़ यात सामान्य नागरिक भरडला जात आह़े नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना घेराव घालण्यात आला़ त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी धरणे आंदोलन केल़े या वेळी काँग्रेसचे निरीक्षक संदीप मंगलोरा, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री डॉ़ हेमंत देशमुख, जिल्हा प्रभारी अॅड़ ललिता पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, आमदार कुणाल पाटील, आमदार काशीराम पावरा, आमदार डी़एस़ अहिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण समिती सभापती मधुकर गर्दे, रमेश श्रीखंडे, मोठाभाऊ पाटील, प्रभाकर चव्हाण, डॉ़ रवींद्र देशमुख, ज्ञानेश्वर नागरे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा गायत्रीदेवी जयस्वाल, महिला शहर जिल्हाध्यक्षा योगिता पवार, किसनराव खोपडे, अलोक रघुवंशी, हर्षवर्धन दहिते, राजीव पाटील, रावसाहेब पाटील, राकेश पाटील, जितेंद्र राजपूत, भाऊ बांगरे, गुलाबराव सोनवणे, रामभाऊ माणिक, नाजीम शेख, राजेंद्र बांगरे, भूपेंद्र धनगर, महेंद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होत़े
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आल़े नोटाबंदी हा भारतातील गरीब, मजूर, दुकानदार, मध्यमवर्गीय आणि छोटय़ा व्यापा:यांवर सजिर्कल स्ट्राइक आह़े 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी 86 टक्के चलनी नोटा बंद करून 1 टक्का काळ्या पैसेवाल्यांना पकडण्यासाठी 99 टक्के प्रामाणिक लोकांना संकटात टाकलेले आह़े
त्यामुळे संपूर्ण देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आह़े विकास प्रक्रिया ठप्प आह़े नोटाबंदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आह़े एकीकडे सर्वसामान्य नागरिक आपला पैसा बँकेतून काढण्यासाठी तासन्तास बँकेच्या बाहेर उभे आहेत, तर दुसरीकडे भाजपा सरकारच्या संरक्षणासाठी 30 टक्के कमिशन घेऊन नोटा बदलून देण्याचा काळा धंदा जोरात सुरू आहे, असा आरोप करीत सहभागी असणा:या एकाही भाजपा नेत्याची चौकशी का करण्यात आली नाही, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला़