भूसंपादनासाठी जिल्हाधिका:यांना प्रस्ताव!
By admin | Published: March 7, 2017 12:25 AM2017-03-07T00:25:25+5:302017-03-07T00:25:25+5:30
महापालिका : स्वामिनारायणलगत पर्यायी रस्त्याचा प्रश्न, शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध मागण्या
धुळे : शहरातील स्वामिनारायण मंदिर रस्त्याचा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आह़े या रस्त्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असून स्वामिनारायण मंदिरालगत पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी जमीन भूसंपादित करून ती मनपाकडे वर्ग करावी, असा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिका:यांना पाठविला आह़े तर दुसरीकडे शासकीय तंत्रनिकेतनने काही मागण्या महापालिकेकडे पत्राद्वारे केल्या आहेत़
स्वामिनारायण मंदिर रस्त्यावरील भिंत पाडण्यात आल्यापासून या रस्त्याचा वाद सुरू आह़े स्वामिनारायण संस्थेने पर्यायी रस्त्यासाठी येणारा खर्च करण्याची तयारी दर्शविली आह़े त्यानुसार महापालिकेने पर्यायी रस्त्यासाठी जमीन भूसंपादित करून देण्याची मागणी जिल्हाधिका:यांकडे केली आह़े सदर जमीन भूसंपादनासाठी येणारा खर्च स्वामिनारायण संस्थेला करावा लागणार आह़े
सदर पर्यायी रस्त्याच्या भूसंपादनासाठी येणारी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निश्चित झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितल़े दरम्यान, महापालिकेने स्वामिनारायण मंदिरासमोर फलक लावला आह़े शहरासाठी मंजूर सुधारित विकास योजना 3 जुलै 2015 पासून लागू झाली आह़े त्याप्रमाणे देवपूर दत्त मंदिरापासून शासकीय तंत्रनिकेतनर्पयत आणि तेथून पुढे महामार्गार्पयतचा रस्ता बीएपीएस स्वामिनारायण मंदिराच्या मालकीच्या जागेच्या बाहेरून जाणारा आह़े तो रस्ता तयार करण्याची कार्यवाही मनपातर्फे सुरू असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आह़े
शासकीय तंत्रनिकेतनचे पत्र
पर्यायी रस्ता शासकीय तंत्रनिकेतनच्या हद्दीतून जात असल्याने सदरच्या जागेचे भूसंपादन केले जाणार आह़े त्या दृष्टीने शासकीय तंत्रनिकेतनशी जिल्हा प्रशासनाचा पत्रव्यवहार सुरू आह़े मात्र शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ऱक़ेचौधरी यांनी मनपाला नुकतेच पत्र दिले असून त्यात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत़ स्वामिनारायण मंदिर रस्त्याच्या कामासाठी शासकीय तंत्रनिकेतनची जितकी संरक्षण भिंत जाणार आहे, त्या भिंतीचे बांधकाम करण्यात यावे, नवीन बांधण्यात येणा:या भिंतीद्वारे चोरांचा उपद्रव होऊ नये यासाठी त्यावर लोखंडी तारेचे कुंपण करण्यात यावे, सदर प्रस्तावित रस्त्यासाठी संस्थेची अंदाजित 7 हजार 400 चौरस मीटर जागा जाणार असल्याने बाजारभावाप्रमाणे जितकी किंमत होईल तेवढय़ा किमतीची इमारत शासकीय तंत्रनिकेतन संस्थेस बांधून देण्यात यावी (पूर्वी कळविण्यात आलेला भाव 5 हजार रुपये प्रती चौ.मी. होता, आता तो 21 हजार रुपये प्रती चौ.मी. आहे) असे पत्रात नमूद आह़े
त्याचप्रमाणे स्वामिनारायण मंदिर परिसरातून शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात सोडण्यात येणारे सांडपाणी भूमिगत जलवाहिनी टाकून बाहेर सोडण्यात यावे, अटी व शर्तीची पूर्तता झाल्याशिवाय व रक्कम वर्ग झाल्याशिवाय संस्थेला पर्यायी रस्त्यासाठी जागा देणे शक्य होणार नाही, असे पत्रात नमूद आह़े त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सर्व आनुषंगिक बाबी तपासल्या जात आहेत़