मोदी सरकारविरोधात जिल्हा काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:29+5:302021-05-31T04:26:29+5:30
वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसांत ...
वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसांत महागाई कमी करणार, अशी अनेक आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र, सात वर्षांनंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही ते पूर्ण करू शकले नाहीत. नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघु उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग केले. मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नाही.
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मोदी सरकार विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी शहराध्यक्ष युवराज करनकाळ, शिरपूर तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, अभिमन भोई, गुलाब कोतेकर, प्रकाश पाटील, अशोक सुडके, पंढरीनाथ पाटील, राजेंद्र देवरे, लहू पाटील, राजेंद्र खैरनार, अलोक रघुवंशी, शाबीर शेख, शाम भामरे, भिवसन भोई, नरेंद्र पाटील, वीरेंद्र झालसे, रितेश पाटील, राहुल माणिक, गणेश गर्द, अविनाश शिंदे, जयेश पाटील, दिलीप शिंदे, दत्ता परदेशी, किरण नगराळे, जावेद शेख, प्रमोद बोरसे, प्रवीण पवार, बापू खैरनार, बानुबाई शिरसाठ, दीपक पाटील उपस्थित होते.