जिल्ह्याचा पाणीप्रश्न, रेल्वेमार्गाला प्राधान्य- डॉ.सुभाष भामरे
By admin | Published: May 26, 2017 01:27 PM2017-05-26T13:27:21+5:302017-05-26T13:27:21+5:30
केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण होत असल्याने या काळातील कामकाजाचा घेतलेला आढावा.
Next
>ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.26- जिल्ह्याचा पाणीप्रश्न व रेल्वेमार्ग हे दोन्ही प्रलंबित प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यात येत असून अन्य प्रश्नांनाही न्याय देण्याचे काम करीत असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी सांगितल़े
अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असतांना 78 कोटींच्या निधीची गरज होती, ते मिळविल्याने डाव्या कालव्याचा प्रश्न सुटला़ धुळे शहराचा पाणीप्रश्न देखील नेहमीच बिकट राहिला असून पुरेसे पाणी उपलब्ध असतांनाही नियोजनाअभावी पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही़ अमृत योजने अंतर्गत अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रार्पयत जलवाहिनी प्रस्तावित करण्यात आली असून तो प्रश्न लवकरच मार्गी लागणार आह़े अक्कलपाडा सिंचन प्रकल्प व शहराचा पाणीपुरवठा हे दोन्ही प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिल्याचे डॉ़ भामरे यांनी स्पष्ट केल़े त्याचप्रमाणे धुळेकरांच्या सर्वाधिक जिव्हाळयाचा प्रश्न असलेला मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा प्रश्न जवळपास दृष्टिपथात असून रेल्वेमार्गाचा डिपीआर तयार करण्यात येत आह़े पुण्याच्या कंपनीकडून रेल्वेमार्गाचे सव्रेक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल व मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल़ रेल्वेमार्गाचा प्रश्न सुटल्यामुळे धुळ्याच्या विकासाला चालना मिळणार असून येत्या काही वर्षात धुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आह़े रेल्वेमार्ग, पाणी प्रकल्प, महामार्गाचे चौपदरीकरण ही कामे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठीची पूर्वतयारी असून हे प्रश्न मार्गी लागल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला गती मिळेल़ सध्या प्रगतिपथावर असलेल्या व भविष्यात प्रस्तावित असलेल्या विकास कामांसाठी भरीव निधी देऊन केंद्र सरकार व राज्य सरकारने परिपूर्ण सहकार्य केल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी स्पष्ट केल़े