धनगर समाजास आदिवासी जमातीच्या सवलती देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:09 PM2019-03-10T12:09:05+5:302019-03-10T12:09:59+5:30
शिंदखेडा : आदिवासी एकता परिषदेतर्फे तहसीलदारांना निवेदन
लोकमत आॅनलाईन
शिंदखेडा : धनगर ही आदिवासी जमात नसल्यामुळे त्यांना आदिवासींच्या सवलती देऊ नये अशी मागणी आदिवासी एकता परिषदेतर्फे करण्यात आली तहसीलदार. साहेबराव सोनवणे यांना निवेदन करण्यात आली.
धनगर आदिवासी जमात नसून त्यांच्या कुठल्याही प्रकारे आदिवासींच्या चालीरीती व पारंपारिक संस्कृतिक मेळ बसत नाही. धनगर ही आदिवासी जमात नाही म्हणून शासनाने कोणत्याही प्रकारचे धनगरांना आदिवासी कोट्यातून सवलती देऊ नये हा एक प्रकारे संविधानातील नियमांचे उल्लंघन आहे. जल ,जंगल, जमिनीशी निगडित असणारा समाज हाच आदिवासी असतो याउलट धनगरांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय कुठल्याही प्रकारे आदिवासींशी तुलना केल्यावर उच्च राहणीमान दिसून येते.
याउलट आदिवासींचे आज देखील कुठल्याही प्रकारे विकास झाला नसून आर्थिक, सामाजिक, राजकीय या तिन्ही निष्कर्षात हे दुर्बल घटक दिसून येते. हे शासनाने लक्षात घ्यावे धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करू नये असे बहुमताने आज आदिवासी समाजाचे म्हणणे आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न देता शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देण्याप्रसंगी सचिव गुलाब सोनावणे, भुपेंद्र देवरे, बापू फुले, अर्जुन सोनावणे, अप्पा भिल, शामभो सोनावणे, न्हानभो भिल एकनाथ भिल, आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.