बस थांबविली नाही म्हणून वाहकाच्या कानशीलात लगावली
By admin | Published: May 31, 2017 12:47 PM2017-05-31T12:47:10+5:302017-05-31T12:47:10+5:30
तरुणाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
Next
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 31 - हात दाखवूनही बस थांबविली नाही म्हणून एकाने बसचालकाच्या कानशिलात मारल्याची घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे घडली. याप्रकरणी तरुणाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
पिंपळनेर गावातील साईबाबा कॉलनी बस थांब्याच्या पुढे पवन दिलीप जगताप (रा़ पिंपळनेर) याने बसला हात दिला़ मात्र बस थांबली नाही, याचा राग येऊन त्याने बस वाहक ज्ञानेश्वर विनायक सोनवणे यांच्या उजव्या कानशीलात लगावली व शासकीय कामात अडथळा आणला़ याप्रकरणी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द भादंवि कलम 353, 332 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े