जैन संघटनेचा डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:51 PM2020-04-22T22:51:50+5:302020-04-22T22:52:17+5:30

धुळे शहर : ८३७ रूग्णांची आतापर्यत तपासणी

Doctor of the Jain Association at your doorstep | जैन संघटनेचा डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

dhule

googlenewsNext

धुळे : भारतीय जैन संघटनेतर्फे फोर्स मोटरच्या सहकायार्ने शिंदखेडा तालुक्यात डॉक्टर आपल्या दारी उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ८३७ रुग्णांची तपासणी झाली आहे. हा उपक्रम मंगळवारपासून धुळे शहर व तालुक्यातही राबवण्यास प्रारंभ झाला. त्यानुसार पहिल्याच दिवशी १४४ रुग्णांची तपासणी झाली.
भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुपतर्फे डॉक्टर आपल्या दारी उपक्रमांतर्गत पहिल्याच दिवशी शहरातील चंपाबाग, पत्रकार कॉलनी, जमनागिरी भिलाटी परिसरातील १४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉ. प्रवीण बोरा, डॉ. राहुल चोरडिया, डॉ. सागर जैन, डॉ. वर्धमान बोरा यांनी तपासणी केली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जैन संघटनेचे विजय दुग्गड, तुषार बाफना, योगेश संघवी, उज्ज्वल दुग्गड, कीतीर्कुमार ताथेड, सचिन कोठारी, चेतन जैन, दीपक छाजेड, अनुज जैन, दीपक चतुरमुथा, अनिल कांकरिया, संजय जैन, सुनील जैन, संजय बोथरा, रवी बोथरा, रमेश बोथरा प्रयत्न केले. दरम्यान या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे़

Web Title: Doctor of the Jain Association at your doorstep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे